हिंगोली- दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव (Rajeev Satavs wife Pradnya Satav) यांची विधानसभेवर अखेर बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय केणेकर (BJP candidate Sanjay Kenekar) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली आहे.
काँग्रेसचे विधानसभेचे आमदार शरद रणपिसे यांचे सप्टेंबरमध्ये आकस्मिक निधन झाल्याने ही हिंगोलीमधील मतदारसंघाची ( जागा रिक्त झालेली होती. त्या जागेसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांनी उमेदवार अर्ज दाखल केला होता. तर त्यांच्या विरोधात भाजपकडून संजय केनेकर यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु ही निवड बिनविरोध (Unopposed election of MLC in Maharashtra) व्हावी यासाठी काँग्रेसच्यावतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते. काँग्रेसच्या नेत्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विधानभवनात भाजपचे उमेदवार संजय केनेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सातव यांची विधानसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. तर सातव यांच्या पत्नी राज्यसभा किंवा विधानपरिषदेला उमेदवारी मिळावी, ही आमचीसुद्धा भावना होती असे मत कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
हेही वाचा-Share Market : आठवड्याच्या सुरूवातीला शेअर बाजार गडगडला! सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची घसरण!
हिंगोली जिल्ह्यात आनंदाचे वातावरण
अनेक दिवसांपासून या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. प्रज्ञा सातव यांची विधानसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून हिंगोली जिल्ह्यामध्ये जल्लोष केला आहे.
निवडीबद्दल प्रज्ञा सातव यांनी मानले आभार
निवडीबद्दल प्रज्ञा सातव यांनी पक्षनेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यासह इतर पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत. तर पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरेल. काँग्रेसची विचारधारा तसेच पक्ष संघटनेत तळागाळात पोहोचविणार असल्याचे प्रज्ञा सातव (Pradnya Satavs reaction after MLC election result) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा-abhinandan varthaman : विंग कमांडर अभिनंदन 'वीर चक्र'ने सन्मानित
शरद रणपिसे यांच्या जागेसाठी दाखल होते दोन उमेदवारी अर्ज
काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर (MLC election after congress leader Sharad Ranpises death) विधानपरिषदेची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी भाजपकडून संजय कणेकर तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली होती. जुलै २०२४ पर्यंत या जागेसाठी विधानपरिषदेची मुदत आहे. येत्या २९ नोव्हेंबरला विधानपरिषदेची रिक्त जागेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार होती. रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर होणारी निवडणूक ही परंपरेप्रमाणे बिनविरोध व्हावी, म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याच दिवशी दुपारी काँग्रेस नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संजय कणेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा अशी विनंती केली होती. भाजपने त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज आज मागे घेतला आहे.
हेही वाचा-ईडीच्या कारवाया 'एनसीबी' छाप, नोटाबंदी घोटाळ्याची चौकशी का करत नाही? शिवसेनाचा खडा सवाल
कोण आहेत संजय केणेकर?
संजय केणेकर हे मराठवाड्यातील भाजपसाठी आक्रमक (BJP leader Sanjay Kenekar information) असा चेहरा आहेत. भाजप विद्यार्थी संघटनेपासून युवा मोर्चा, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष, २० वर्ष नगरसेवक, उपमहापौर, गटनेता, कामगार आघाडी सरचिटणीस, कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष, म्हाडा सभापती, संभाजी नगर जिल्हाध्यक्ष या विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. मराठवाड्यातील आक्रमक असा कार्यकर्ता असल्याने पक्षश्रेष्ठींनी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे.
कोण आहेत प्रज्ञा सातव ?
प्रज्ञा सातव या काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची राज्यसभेवर वर्णी लागेल अशी चर्चा होती. मात्र, प्रज्ञा सातव यांना राज्यसभेचे तिकीट नाकारण्यात आले. त्यावेळी त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचे निधन झाले. त्यामुळे रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लागली आहे. काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेचे तिकीट देण्यात येत असल्याचे जाहीर केले होे. त्यानंतर प्रज्ञा सातव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.