ETV Bharat / state

आरोपी शोधा.. बक्षीस मिळवा..! हतबल पोलीस यंत्रणेकडून जाहिरात प्रसिद्ध - hingoli police administration

पोलिसांकडे श्वान पथक, ठसेतज्ज्ञ, गोपनीय पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखा ही सर्व यंत्रणा आहे. मात्र, आरोपी शोधून देण्यासाठी जाहिरातबाजी करण्याची ही वेळ कशी आली, असे प्रश्न जाहिरात पाहिल्यानंतर उपस्थित होत आहेत.

police adminitration failed to arrest accused in hingoli
खुनातील आरोपी शोधण्यास पोलीस यंत्रणेला अपयशी
author img

By

Published : Jan 31, 2020, 9:16 AM IST

हिंगोली - जिल्ह्यात दिवसेंदिवस खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तर तेच दुसरीकडे आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस प्रशासन हतबल होताना दिसत आहे. एका खुनाच्या घटनेत आरोपीचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनास जाहिरात करण्याची वेळ आली आहे. तसेच या आरोपीवर पोलीस प्रशासनाने 50 हजार रुपयांचे बक्षीस ठेवले आहे.

मथुराबाई पांडुरंग कोरडे (वय - ६५, रा. तळणी) ही महिला 4 जानेवारीला सकाळी दहा ते अकरा वाजता शेतात शेळ्या चारण्यासाठी गेली होती. सायंकाळच्या सुमारास शेळ्या घरी परत आल्या. मात्र, मथुराबाई घरी परतआल्या नाहीत. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला असता अज्ञाताने महिलेचा गळा दाबून खून केल्याचे आढळले. तसेच त्यांच्या अंगावरील सर्व दागिने लंपास केले गेले होते. याप्रकरणी महिलेचा मुलगा नागोराव कोरडे यांच्या फिर्यादीवरून नरसी पोलीस ठाण्यात 5 जानेवारी रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

नरसी पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, महिन्याच्या शेवटी तपास अचानक थंड झाला. यानंतर पोलिसांवर आरोपी शोधून देण्यासाठी जाहिरात करण्याची वेळ येऊन ठेपली. विशेष म्हणजे नरसी पोलिसांनी खुनातील आरोपी शोधून देण्याऱ्याला 50 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. यामुळे आता कोण हे बक्षीस घेण्यासाठी आरोपी शोधून देईल, याचे उत्तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये मिळेल.

हेही वाचा - 'मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेबाबत तपासणी करावी लागणार'

पोलिसांकडे श्वान पथक, ठसेतज्ज्ञ, गोपनीय पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखा ही सर्व यंत्रणा आहे. मात्र, आरोपी शोधून देण्यासाठी जाहिरातबाजी करण्याची ही वेळ कशी आली, असे प्रश्न जाहिरात पाहिल्यानंतर उपस्थित होत आहेत. जिल्हा पोलीस यंत्रणा गुन्हेगारांना शोधण्यात सपशेल अपयशी ठरली की काय, अशी चर्चा सुरू आहे.

Intro:*

हिंगोली- जिल्ह्यात दिवसेंदिवस खुनाच्या घटनेत वाढ झालीय, आरोपी पर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे तशी यंत्रणा देखील असते, मात्र एका खुनाच्या घटनेत अशी कोणती यंत्रणा कमी पडलीय की, खुनातील आरोपीचा शोध घेण्यासाठी हिंगोली पोलीस प्रशासनास चक्क जाहिरात बाजी करण्याची दुर्दैवी वेळ आलीय. ती ही एवढ्या कमी वेळात अन 50 हजाराच्या बक्षीसापाई खरच कोण व्यक्ती वैर पत्करेल. सोशल मीडिया अन वाटसप ग्रुपवर जाहिरात पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय.
Body:
मथुराबाई पांडुरंग कोरडे (६५) रा. तळणी ही महिला 4 जानेवारी 2020 रोजी सकाळी दहा ते अकरा वाजता शेतात शेळीचे पिले चरण्यासाठी गेली होती. मात्र सायंकाळच्या सुमारास पिल्ले घरी वापस आले मात्र आई वापस न आल्याने कुटुंबातील नातेवाईकांनी व ग्रामस्थानी शोधा शोध केली असता. अज्ञात आरोपीने सदरील महिलेचा गळा दाबून खून केला अंगावरील सर्व दागिने लंपास केले होते. या प्रकरणी महिलेचा मुलगा नागोराव कोरडे यांच्या फिर्यादीवरून नरसी पोलीस ठाण्यात 5 जानेवारी रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय.नरसी पोलिसानी तपासही सुरू केला. महिन्याच्या शेवटी शेवटी का कुणास ठाऊक अचानक तपास थंड झाला अन पोलिसांवर आरोपी शोधून देण्यासाठी जाहिरात करण्याची दुर्दैवी वेळ येऊन ठेपलीय, विशेष म्हणजे नरसी पोलिसांनी खुनातील आरोपी शोधून देण्याऱ्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस ही जाहीर केलेय. त्यामुळे आता कोण हे बक्षिस घेण्यासाठी आरोपी शोधून देईल, अन आयुष्यभर वैर पत्करून घेईल. Conclusion:विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाकडे श्वान पथक, ठसेतज्ञ, गोपनीय पथक एवढेच काय तर स्थानिक गुन्हे शाखा हे सर्व असतानाही आरोपी शोधून देण्यासाठी जाहिरातबाजी करण्याची ही दुर्दैवी वेळ आली तरी कशी? असे एक ना अनेक प्रश्न सर्वांनाच जाहिरात पाहिल्यानंतर उपस्थित होत आहेत. या जाहिरात बाजी वरून मात्र हिंगोली पोलीस यंत्रणा आरोपी शोधण्यासाठी सपशेल अपयशी ठरली असल्याचे दिसून येतेय.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.