हिंगोली - वसमत तालुक्यातील जवळा बाजार येथे सुरू असलेल्या कुंटनखान्यावर हट्टा पोलिसांनी रविवारी छापा टाकला. या छाप्यात 26 महिलांना ताब्यात घेतले असून यातील 6 महिला आणि एका पुरुषावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. हे सात जण ताब्यात घेतलेल्या इतर महिलांना देहविक्रीसाठी प्रवृत्त करत होते. या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - परभणीतील व्यंकटी शिंदेच्या टोळीवर मोक्का; शहरातील टोळीयुद्धाला पोलिसांचा लगाम
लक्ष्मीबाई रावसाहेब नरवाडे (वय 43 रा. सुरजा ता. जिंतूर), अनिता संतोष चांदनकर (वय 35 रा. परभणी, सध्या रा. जवळा बाजार), साहिल सुलताना सयद साबोद्दीन (वय 40 रा. जवळा बाजार), शमाबी अजगर खान (वय 54 रा. पुसद), राधाबाई धनु चव्हाण (वय 55), माया नामदेव कीर्तने (वय 30), सुलोचना केशव भोसले(वय 40 जवळा बाजार), सागरबाई सुदाम तोंडे (वय 45), शेख फजत शेख नूर (वय 36) अशी या कारवाईत ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा - प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा; गुंगीचे औषध देऊन चिरला गळा
जवळा बाजार येथे गेल्या अनेक दिवसांपासून वेश्याव्यवसाय सुरू असून त्याठिकाणी पीडित स्त्रिया आणि काही युवतींना देह विक्रीस प्रवृत्त केले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश देशमुख यांनी वसमत ग्रामीण आणि शहर पोलीस ठाण्याचे पथक तयार केले. यात वसमत पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गजानन मोरे, वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक बळीराम बंदखडके, पोलीस उप निरिक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पंढरीनाथ बोधनापोड लेकुळे यांनी जवळा बाजार येथील कुंटणखाण्यावर छापा टाकला. यामध्ये 6 महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले.
हेही वाचा - 'गाऊन' घालून चोरी करणारा आरोपी गजाआड, 25 लाखाचा मुद्देमाल जप्त
यामध्ये 26 पीडित महिलांचा समावेश असल्याची माहिती पोलीस निरिक्षक खंडेराय यांनी दिली. तर घटनास्थळावरून मोबाईल, रोख रक्कम जप्त केली आहे. या सामूहिक कारवाईने मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे.