हिंगोली - धार्मिक कार्यक्रमासह विवाह समारंभातील सुंदर क्षण टिपणाऱ्या छायाचित्रकारासमोर यंदा कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाचा फटका केवळ छायाचित्रकारांनाच नव्हे तर, फोटोंवर श्रम घेणाऱ्या एडिटरांनाही बसला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे छायाचित्रकारांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या सगळ्यांचीच उपासमार होत असल्याचे छायाचित्रकार सुनील प्रधान यांनी सांगितले.
या वर्षी लग्नासाठी अनेक मुहूर्त असल्याने दुकान व इतर साहित्यासाठी घेतलेल्या कर्जाची काही रक्कम फिटेल असे वाटत होते. पण, कोरोनाने जगभरात थैमान घातले. यामुळे टाळेबंदी सुरू झाली. त्यामुळे लग्नाचे मुहूर्त असूनही अनेकांचे लग्न लांबणीवर गेले. ज्यांचे झाले त्यांचेही मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थित झाले. त्यामुळे कोणीही छायाचित्रीकरण केले नाही. यामुळे छायाचित्रकारांचा व्यवसाय ठप्प झाला. व्यवसाय ठप्प, डोक्यावर असलेले कर्ज आणि प्रपंचासाठी लागणारा खर्च यामुळे छायाचित्रकारांकडे पैसाच शिल्लक राहत छायाचित्रकाराने सांगितले.
हेही वाचा - हिंगोलीतील शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच, कर्जबाजारीपणामुळे तरुणाने घेतला गळफास