ETV Bharat / state

धक्कादायक! सेनगावात 1 लाख 45, तर हिंगोलीत चोरट्यांनी पळविले 2 लाख 80 हजार - पैस पडल्याचे सांगून चोरी

सेनगावातील घटना ताजी असतानाच हिंगोली शहरातील खुराणा पेट्रोल पंप परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या राजू बेंगाळ यांना चोरट्यांनी रस्त्याच्या कडेला दीडशे रुपये पडल्याचे सांगून दुचाकीला अडकवलेली पैशाची बॅग पळविली. या बॅग मध्ये दोन लाख 80 हजार रुपयांची रक्कम होती. ही रक्कम मोंढा भागातील व्यापाऱ्याची होती, ही रक्कम बँकेतून काढून बेंगाळ हे दुचाकीवरून मोंढ्याकडे जात असतानाही घटना घडली.

हिंगोलीत चोरट्यांनी पळविले 2 लाख 80 हजार

author img

By

Published : Sep 3, 2021, 7:00 AM IST

हिंगोली- जिल्ह्यामध्ये होणाऱ्या चोरीच्या घटना थांबताना दिसत नाहीत. चोरीसाठी चोरटे रोज नवनवीन युक्ती लढवत आहेत. जिल्ह्यात चोरटे आता भर दिवसा अंगावर धूळ, खाण फेकून किंवा पैसे पडल्याचे सांगत नागरिकांचे पैसे, दागिने लूट करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सेनगावात 1 लाख 45 हजार रुपयांची अशाच प्रकारे चोरी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हिंगोलीतदेखील चोरट्यांनी एकाला रस्त्यावर तुमचे दीडशे रुपये पडल्याचे सांगून त्याच्याकडील 2 लाख 80 हजार रुपये पळविले आहेत. या दोन्ही घटनेने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिंगोलीत चोरट्यांनी पळविले 2 लाख 80 हजार
हिंगोलीत चोरट्यांनी पळविले 2 लाख 80 हजार
हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून धाडसी चोऱ्याचे सत्र सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हे चांगलेच धास्तावले आहेत. चोरटे देखील आता वेगवेगळ्या प्रकारचे फंडे चोरीसाठी वापरत आहेत यामध्ये वाहनाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर घाण फेकणे, किंवा रस्त्याच्या कडेला पडलेले पैसे सांगून चलबिचल निर्माण करून, त्यांच्या कडील पैसे लांबविण्यास सुरुवात केली आहे. अशीच एक घटना बुधवारी सेनगाव येथे घडली, पैसे परत करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीच्या अंगावर चोरट्याने नकळत घाण फेकली आणि ती व्यक्ती घाण साफ करत असताना, संधी साधत चोरट्याने त्या व्यक्तीकडील 1 लाख 45 हजाराची रक्कम पळविली.

सेनगावातील घटना ताजी असतानाच हिंगोली शहरातील खुराणा पेट्रोल पंप परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या राजू बेंगाळ यांना चोरट्यांनी रस्त्याच्या कडेला दीडशे रुपये पडल्याचे सांगून दुचाकीला अडकवलेली पैशाची बॅग पळविली. या बॅगमध्ये दोन लाख 80 हजार रुपयांची रक्कम होती. ही रक्कम मोंढा भागातील व्यापाऱ्याची होती, ही रक्कम बँकेतून काढून बेंगाळ हे दुचाकीवरून मोंढ्याकडे जात असतानाही घटना घडली.

चोरट्याने पाठलाग केल्याचा संशय-

बेंगाळ यांनी बँकेतून रक्कम काढल्यानंतर ते मोंढ्याकडे जात होते, त्यावेळी अचानकच त्यांना खुराणा पेट्रोल पंपाजवळ काहीजणांनी तुमच्या खिशातील दीडशे रुपये पडले आहेत, असे सांगून त्यांना मोठ्याने आवाज देत माहिती दिली. त्यामुळे बेंडाळे हे पैसे घेण्यासाठी प्रयत्न करत असताना चोरट्यांनी त्यांच्या गाडीला लटकवलेली पैशाची पिशवी पळविली. मात्र, या घटनेवरून चोरटा हा बेंगाळ यांचा पाठलाग करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

दोन्ही घटनेतील चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद-

सेनगाव आणि हिंगोली येथील दोन्ही घटनेतील चोरटे हे सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहेत. मात्र अजून तरी पोलीस या चोरट्यांपर्यंत पोहोचू शकले नाहीत, त्यांनी सीसीटीव्ही फुटेज हे हस्तगत केले असून त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आता शहरासह जिल्ह्याबाहेर देखील शोध मोहीम सुरू केली आहे. मात्र वारंवार घडत असलेल्या या घटनांमुळे सर्वसामान्य व व्यापारी चांगलेच भयभित झाले आहेत. विशेष म्हणजे चोरट्यांनी व्यापाऱ्याकडे मोर्चा वळवला असल्याचे गेल्या काही दिवसातील घटनांवरून स्पष्ट होत आहे. काही दिवसापूर्वी अशाच एका व्यापाऱ्याकडे काम करत असणाऱ्या व्यक्तीला बंदुकीचा धाक दाखवून त्याच्याकडील देखील रक्कम पळविली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये सध्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असले तरी, त्यांचा शोध घेण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत.

सहा महिन्यात किती घडल्या चोरी व इतर घटना-

दिवसेंदिवस घडत चोरी आणि लूटमारीच्या घटनांमुळे शहर व जिल्ह्यात चोरट्यांना पोलिसांचे भय उरले नसल्याचे चित्र दिसून येत आहे. जानेवारी ते जुलै या महिन्यांमध्ये चोरीच्या घटना मोठ्याप्रमाणात घडल्या आहेत. यात दोन दरोड्यांच्या घनटांचाही समावेश आहे. हे दोन्ही दरोडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणले आहेत. तर नऊ जबरी चोऱ्या झाल्या असून, यापैकी 4 उघडकीस आल्या आहेत. तर 5 चोऱ्यांची प्रकरणे अद्याप पेंडिंग आहेत, या सहा महिन्यात तब्बल 49 घरफोड्या झाल्या असून, फक्त 11 उघड झाल्या आहेत. तर एकूण 187 चोऱ्या झाल्या असून, 74 चोऱ्या उघड झाल्या आहेत. यामध्ये 74 दुचाकी चोरी झालेल्या असून, 10 दुचाकी मिळाल्या आहेत, तर या पैसे पळविण्याच्या घटनेने मात्र अजून भर पडली आहे. दिवसेंदिवस वाढत्या घटना मुळे चोरटे हे पोलिसांना एक प्रकारे आवाहनच करत असल्याचे दिसून येत आहे. आता या ताज्या दोन्ही ही घटनेतील आरोपीला पोलीस प्रशासन केव्हा बेड्या ठोकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.