ETV Bharat / state

हिंगोलीत 'ऑपरेशन मुस्कान' : रस्त्यावर खेळ दाखवणाऱ्या मुलांना सुधारकेंद्रात पाठवले, पालकांचे केले समुपदेशन - operation muskan

हिंगोली येथे ऑपरेशन मुस्कान अंतर्गत विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये अल्पवयीन बालक ताब्यात घेत त्यांची जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाईसाठी बाल सुधार समितीकडे ताब्यात देण्यात आले.

hingoli
हिंगोलीत 'ऑपरेशन मुस्कान'
author img

By

Published : Dec 26, 2019, 9:26 AM IST

हिंगोली - अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मानव अहोरात्र प्रयत्न करतो, अन् त्या पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असतो. मात्र, उत्तर प्रदेशातून दाखल झालेल्या कुटुंबाचा रस्त्यावरील संगीतच पोटाची खडगी भरण्याचा आधार बनला आहे. मात्र, ऑपरेशन मुस्कान अंतर्गत या बालकांवर कारवाई करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निकिता जब्बार राठोड (८), जानवी कैलास राठोर(४), गोविंद राठोर(५), आर्या गोविंद राठोर(५), धरम गोविंदा राठोर (१) अशी ताब्यात घेतलेल्या बालकांची नावे आहेत.

हिंगोलीत 'ऑपरेशन मुस्कान'

दिलीप कुमार असे या कुटूंब प्रमुखाचे नाव आहे. हे कुटूंब उत्तरप्रदेशमधील आझमगड येथील रहिवासी आहे. घरात आठरा विश्व दारिद्र्य अशा परिस्थितीत दिलीप कुमार यांनी संसाराचा गाडा हकण्यासाठी रस्त्यावर संगीत वाजवून खेळ दाखवण्याची सुरुवात केली. दिलीपच्या वडिलांचा देखील हाच व्यवसाय होता, ते बघतच दिलीप हे सर्व काही करू शकला आहे. दिलीप अन् त्याची बहिण हे काम करतात. दिलीपची बहिण ही उत्कृष्ट बँजो वाजवते तर दिलीप स्वतः तबला, ढोलकी वाजवतात. तसेच दिलीपची बहिण गुड्डी ही उपस्थितांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आकर्षक कसरत करते. बँजो अन् ढोलकीच्या तालावर ती कसरत पाहून, तिला बक्षीस रूपात कधी १० तर कधी २० रुपये मिळतात आणि यातुनच या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

हेही वाचा - हिंगोलीत रिमझिम पावसाची हजेरी; रब्बी पिकांना होणार फायदा
एकीकडे वर्षाचा शेवटचा दिवस साजरा करण्याच्या तयारीत सर्वजण लागलेले आहेत. प्रत्येकजण आपापल्यापरिने नवीन वर्ष साजरा करण्याच्या तयारीत आहे. मात्र, हे कुटुंब रस्त्यावर संगीत वाजवून संध्याकाळच्या भाकरीची व्यवस्था करण्यासाठी धडपडत आहे. कसरत करणाऱ्या गुड्डीला शिक्षणाचा जराही गंध नाही, ती जर शाळेत गेली तर मग परिवाराच्या रोजी रोटीचा प्रश्न उपस्थित होईल असे दिलीप यांना वाटते. गुड्डीला शिकवण्याची खूप इच्छा आहे मात्र, तिने कसरत केलीच तर आमचं कुटुंब चालते अन्यथा उपाशी दिवस ढकलल्याशिवाय पर्यायच नाही असे दिलीप सांगतात. यावरून आजही पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंबाला कशी कसरत करावी लागते हेच यावरून दिसून येत आहे.

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत बालक घेतली ताब्यात, पालकांचे केले समुपदेशन
हिंगोली येथे ऑपरेशन मुस्कान अंतर्गत विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये अल्पवयीन बालक ताब्यात घेत त्यांची जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाईसाठी बाल सुधार समितीकडे ताब्यात देण्यात आले. या अंतर्गत आत्तापर्यंत २७ कारवाया करण्यात आल्या असून ही ३१ वी कारवाई असल्याचे सपोनि पुंडगे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. मात्र, या कारवाईमुळे हे राठोर कुटूंब घाबरून गेले असून, कारवाईमुळे शिक्षणाचे महत्व कळाले असल्याचे त्यांनी सांगितले. आता आम्ही आमच्या गावी परत जाऊन मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करणार असल्याचेही राठोर कुटुंबियांनी सांगितले.

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत बालकांवर करण्यात आलेल्या कारवाईने राठोर कुटूंब धस्तावले. या कारवाईत सदर मुलांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि सदर कुटुंबियातील पालकांचे समुपदेशन करण्यात आले. या सर्व प्रकाराने घाबरून गेलेला दिलीप मात्र बराच वेळ होऊन परतला नाही. त्यामुळे कुटुंबासह पोलीस त्याचा शोध घेत होते.

हेही वाचा - राष्ट्रीय ग्राहक दिनी शासनाकडे रेशन दुकानदारांच्या तक्रारीचा पाऊस

Intro:
*हिंगोली*- अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मानव अहोरात्र प्रयत्न करतेय. अन त्या पूर्ण करण्यासाठी काही तरी युक्ती सुचवितेय. मात्र उत्तर प्रदेशातुन दाखल झालेल्या कुटुंबाचा रस्त्यावरील संगीतच बनलय पोटाची खळगी भरण्याचा आधार. लोकांच्या आनंदात आपला आनंद शोधतय.मात्र ऑपरेशन मुस्कान अंतर्गत या बालकांवर कारवाई केल्याने त्यांच्या कुटुंबात भीतीच वातावरण निर्माण झालय.

Body:दिलीप कुमार अस या कुटुंब प्रमुखांच नाव आहे. हे कुटुंब उत्तर प्रदेश मधील आझम गड येथील रहिवासी आहे. घरात आठरा विश्व दारिद्र्य आशा परिसरात कुटुंब प्रमुख दिलीप कुमार हे संसाराचा गाडा हकण्यासाठी संगीत निवडलय, ते कोणतं आलिशान नव्हे तर रस्त्यावरच. दिलीपच्या वडिलांचा देखील हाच व्यवसाय होता, ते पाहत पाहत दिलीप हे सर्व काही शकलेला आहे. दिलीप अन त्यांची बहीण हे काम करताहेत. दिलीपची बहीण ही उत्कृष्ट बेंजो तर दिलीप स्वतः तबला, ढोलगी वाजवतात अन दिलीप ची बहीण गुडी ही उपस्थिताचे लक्ष वेधून घेण्यासाठी आकर्षक कसरत करतेय. बेंजो अन ढोलगीच्या तलावर ती कसरत पाहून, तिला बक्षीस रूपात दहा कोणी वीस रुपये देतय. यातुनच या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतोय.
एकीकडे वर्षाच्या शेवटचा दिवस साजरा करण्याच्या तयारीत सर्वजण लागलेले आहेत. काही काही मित्र तर बाहेर गावी जाण्याची देखील तयारी दर्शवित आहेत. एवढेच काय तट वर्षाचा शेवटचा दिवस साजरा करण्यासाठी आप आपल्या मित्राला ही आमंत्रित केल्याचे आपण पाहतोय. मात्र हे कुटुंब रस्त्यावर संगीत वाजवून संध्याकाळच्या भाकरीची व्यवस्था करण्यासाठी झगडतंय. कसरत करणाऱ्या गुडीला शिक्षणाचा जराही गंध नाहीये. ती जर शाळेत गेली तर मग आमच्या रोजी रोटीच कस ? हा प्रश्न दिलीप यांनी केलाय. तिला शिकवण्याची खूप इच्छा आहे मात्र तिने कसरत केलीच तर आमचं कुटुंब चालतय.नाही तर उपाशी दिवस ढकलल्या शिवाय पर्यायच नाही. यावरून आजही पोटाची खळगी भरण्यासाठी कशी कुटुंबाला कसरत करावी लागलेत हेच यावरून दिसून येतंय.

*Conclusion:ऑपरेशन मुस्कान अंतर्गत बालक घेतली ताब्यात* *पालकांचे केले समुपदेशन*

हिंगोली येथे ऑपरेशन मुस्कान अंतर्गत विविध ठिकाणी कारवाई केली यामध्ये अल्पवयीन बालक ताब्यात घेत त्यांचे जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून पालक पुढील कारवाईसाठी बाल सुधार समितीकडे ताब्यात देण्यात आलेय. आता पर्यंत 27 कारवाया केल्या असून, ही 31 वी कारवाई असल्याचे सपोनि पुंडगे यांनी इटीव्ही भारत शी बोलताना सांगितले. मात्र या कारवाई मुळे हे कुटूंब घाबरून गेले असून, कारवाई मुळ शिक्षणाच महत्व तरी कळलंय. आता आम्ही आमच्या गावी परत जाऊन मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करणार असल्याचे महिलेने सांगितलेय.

*अशी आहेत ताब्यात घेतल्याची नावे*

निकिता जब्बार राठोड (८), जानवी कैलास राठोर(४), गोविंद राठोर(५), आर्या गोविंद राठोर(५), धरम गोविंदा राठोर (१) यांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली. या सर्व प्रकाराने घाबरून गेलेला पुरुष मात्र बराच वेळ होऊन ही परतला नाही. त्यामुळे कुटुंबासह पोलीस त्या पुरुषाचा शोध घेत होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.