ETV Bharat / state

टिप्परच्या धडकेत एकजण जागीच ठार तर १ गंभीर जखमी

सुभाष अर्जुन देवकर असे मृताचे नाव आहे. जखमी यलप्पा अर्जून देवकर याच्यावर जिल्हासामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात पूर्व वैमनस्यातून घडवल्याची परीसरात चर्चा आहे.

author img

By

Published : May 12, 2019, 8:52 PM IST

हिंगोली अपघात

हिंगोली - जिल्ह्यातील वटकळी फाट्यापासून काही टिप्परने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर त्याच दुचाकीवरील दुसरा गंभीर जखमी झाला आहे. सुभाष अर्जुन देवकर असे मृताचे नाव आहे. जखमी यलप्पा अर्जून देवकर याच्यावर जिल्हासामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात पूर्व वैमनस्यातून घडवल्याची परीसरात चर्चा आहे.

यलप्पा आणि सुभाष हे दोघे जण एका दुचाकीवरून प्रवास करत होते. दरम्यान सुकळी फाट्याजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव टिप्परने या दोघा भावंडांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात सुभाष हा जागीच ठार झाला. तर यलप्पा गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी यल्लप्पा यांना नागरिकांच्या मदतीने सेनगाव येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केले. यल्लाप्पा यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पूर्व वैमनस्यातून घटना घडल्याचा संशय

ही घटना पूर्व वैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.त्यामुळे या घटनेत खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या घटनेने मात्र संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अजून तरी या घटनेत कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे, सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सरदारसिंह ठाकुर यांनी सांगितले.

Intro:हिंगोली जिल्ह्यातील वटकळी फाट्यापासून काही अंतरावरच टिप्परने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर त्याच दुचाकीवरील दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमी वर जिल्हासामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुभाष अर्जुन देवकर असे मयताच नाव आहे. हा अपघात पूर्व वैमनस्या मधून घडवल्याची परीसरात चर्चा आहे.

Body:यलप्पा अर्जुन देवकर हा गंभीर जखमी झाला आहे. यलप्पा आणि सुभाष हे दोघे जण एका दुचाकीवरून प्रवास करत होते दरम्यान सुकळी फाट्याजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव टिप्परने या दोघा भावंडांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात सुभाष हा जागीच ठार झाला तर केलपा गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी यल्लप्पा यांना नागरिकांच्या मदतीने सेनगाव येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केले. यल्लाप्पा यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले आहे. तर घटनेचा पंचनामा करून प्रेत शेवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविले आहे.

Conclusion:ही घटना पूर्व वैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.त्यामुळे या घटनेत खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या घटनेने मात्र संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अजून तरी या घटनेत कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे, सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सरदारसिंह ठाकुर यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.