ETV Bharat / state

पुलावरून दुचाकी कोसळून अपघात; एक ठार, दोघे गंभीर जखमी - हिंगोली दुचाकी अपघात

ऋतिक वाघमारे,वैभव बोरकर व सुरज दळवे हे तीन मित्र कळमनुरी तालुक्यातील नांदापूरमधील यात्रा पाहुन रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास दुचाकी वरून हिंगोलीकडे निघाले होते. वारंगा मसाई मार्गावरावरुन जाताना व्यवस्थीत रस्ता न दिसल्याने, दुचाकी पुलावरून जोरात खाली कोसळली. या अपघातात ऋतिकचा जागीच मृत्यू झाला. तर वैभव आणि सूरज गंभीर जखमी झाले आहेत.

one dead and two injured in accident  at hingoli
पुलावरून दुचाकी खाली कोसळुन अपघात; एक ठार, दोघे गंभीर जखमी
author img

By

Published : Jan 9, 2020, 2:55 AM IST

हिंगोली - जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताच्या मालिका सुरूच आहे. पुन्हा एकदा कळमनुरी ते वारंगा मसाई मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून दुचाकी पुलावरून खाली कोसळून एक जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

ऋतिक वाघमारे (वय १७) मृत तरुणाचे नाव आहे. तर, वैभव बोरकर आणि सुरज दळवे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघे जण कळमनुरी तालुक्यातील नांदापूरमधील यात्रेवरून रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास दुचाकी वरून हिंगोलीकडे निघाले होते. वारंगा मसाई मार्गावरावरुन जाताना व्यवस्थीत रस्ता न दिसल्याने, दुचाकी पुलावरून जोरात खाली कोसळली. जमिनीवर जोराने आदळल्याने ऋतिकचा जागीच मृत्यू झाला. तर वैभव अन सूरज दोघे जण दूर फेकले गेले. दरम्यान, काही वाहन चालकांनी या घटनेची माहिती कळमनुरी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले. तर मृताचाही पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हारुग्णालयात पाठविला.

जिल्ह्यात रोजच अपघाताच्या घटना घडत असल्याने, वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोज अपघात घडत असल्याने वाहन चालक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अतिशय धीम्या गतीने सुरू असलेली रस्त्याची कामे लवकारात लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहन चालकांनी केली.

हेही वाचा - राज ठाकरे हाजिर हो.. १८ फेब्रुवारीला रांची न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Intro:

हिंगोली- जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताच्या मालिका सुरूच आहे. पुन्हा एकदा कळमनुरी ते वारंगा मसाई मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून दुचाकी पुलावरून खाली कोसळली. यात एक जण जागीच ठार झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना 8 जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमींना कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल दाखल केलेय. रस्त्याचे काम सुरू असल्याने अपघाताच्या घटना काही केल्या कमी होत नसल्याचेच भयंकर चित्र सध्यव जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.

Body:ऋतिक वाघमारे (१७) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर वैभव बोरकर व सुरज दळवे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे तिघे जण कळमनुरी तालुक्यातील नांदापूर भागात असलेल्या यात्रेवरून रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास दुचाकी वरून हिंगोली कडे निघाले होते. तर ते कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई जवळ पोहोचले असता, समोर जाण्यासाठी रस्त्याची बाजू न दिसल्याने, दुचाकी पुलावरून जोरात खाली कोसळली. हा अपघात एवढा भयंकर होता की ऋतिक हा जमिनीवर जोराने आदळला अन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर वैभव अन सूरज दोघे जण दूर फेकल्या गेले. या मध्ये त्या दोघांना देखील गंभीर मार लागलाय. दोघे जण विव्हळत पुलाखाली पडले होते, वरून जाणाऱ्या वाहन चालकांना मदतीसाठी जोर जोरात ओरडून मागणी करीत होते. वाहन चालकांनी वाहने थांबवून त्याना मदत करीत घटनेची माहिती कळमनुरी पोलिसांना दिली.घटनेची माहिती मिळताच पोनि रंजित भोईटे, पोउपनी ज्ञानोबा मुलगीर यांनी घटनास्थळी धाव घेतली अन्न जखमींना इतर प्रवाशांच्या मदतीने कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले. तर मयताचाही घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हारुग्णालयातच हलविला. Conclusion:जिल्ह्यात रोजच अपघाताच्या घटना घडत असल्याने, वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक दिवशी अपघात घडत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून वाहन चालक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अतिशय धीम्या गतीने सुरू असलेली रस्त्याची कामे वेळेत उरकून घेण्याची मागणी वाहन चालकातून होत आहे. तर मोठ्या आनंदाने यात्रा महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी जात असलेल्या मित्रांच्या आनंदावर विरजण पडले असून, डोळ्या देखत आपला सहकारी आपल्याला सोडून गेल्याचे दुःख सांगताना जखमी झालेले मित्र ओक्षाबोक्शी रडत होते. तर वाहन धारक त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करीत होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.