ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात सहाव्या दिवशीही पावसाची संततधार कायम - पिकांना जीवदान

हिंगोली जिल्ह्यात सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावासामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र या पावसामुळे जिल्ह्यात नव्याने बनवण्यात येत असलेल्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात सहाव्या दिवशीही पावसाची संततधार कायम
author img

By

Published : Jul 30, 2019, 9:03 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात पाच ते सहा दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. मागील सहा दिवस सुरू असलेल्या पावासामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र या पावसामुळे जिल्ह्यात नव्याने बनवण्यात येत असलेल्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. तर ज्या भागात रस्तेच नाहीत अशा भागात वाहनचालकांना रस्ता पार करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

हिंगोली जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशीही पावसाची संततधार सुरू आहे
हिंगोली जिल्ह्यात सलग सहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. जंगलातील नदी नाले वाहण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्यास मदत झाली आहे. यंदा मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. पाऊस लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्या देखील लांबणीवर गेल्या होत्या. मात्र उशिरा का होईना हजेरी लावलेल्या या पावसामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे. सुरू असलेल्या संततधार पावसामुळे काही काळ त्रास होणार आहे. मात्र भविष्यात हा पाऊस खरिपाच्या पिकाची वाढ पूर्ण होण्यासाठी लाभदायी ठरणार असल्याच्या, प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून येत आहेत.

Intro:हिंगोली जिल्ह्यात मागील पाच ते सहा दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. मात्र पावसाचा पाहिजे तसा अजिबात जोर नाही. रिमझिम तर कधी पावसाचा काही प्रमाणात जोर वाढत आहे. आज देखील दिवसभर रिमझिम पाऊस सुरू आहे. या सहा दिवसाच्या पावासाने खरीप पिके धोक्याच्या बाहेर आहेत. आता कुठे नदी नाले वाहत आहेत. मात्र पावसाने जिल्ह्यात नव्याने बनविण्यात येत असलेल्या रस्त्याची पूर्णता वाट लागलेली आहे. तर ज्या भागात रस्तेच नाहीत अशा भागातील वाहनधारकांना रस्ता पार करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Body:हिंगोली जिल्ह्यात सलग सहा दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नदी नाले आता वाहते झाले आहेत. तर जंगली भागातील पान व त्यात पाणी साचल्यामुळे वन्य प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती थांबण्यास मदत झाली आहे. यंदा मृगनक्षत्र कोरडे ठाक गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती पाऊस लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्या देखील लांबणीवर गेल्या होत्या मात्र उशिरा का होईना हजेरी लावलेल्या या पावसामुळे. बळीराजा सुखावला आहे. पेरणी झाल्या झाल्या पावसाच्या चिंतेत डुबलेल्या शेतकऱ्यांना या पाच दिवसाच्या संततधार पावसाने दिलासा मिळालाय. प्रत्येक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता आनंद दिसून येत आहे. संततधार सुरू असलेल्या पावसामुळे काही काळ त्रास होणार असला तरी भविष्यात हा पाऊस खरिपाच्या पिकाची वाढ पूर्ण करण्यासाठी अन उत्पन्नत भर करण्यासाठी लाभदायी ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून उमटत आहेत.

Conclusion:जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 265. 68 मिमी पावसाची नोंद प्रशासनाकडे झाली आहे. तर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या आज अखेर 26. 40 टक्के एवढी पावसाची नोंद झाली आहे. अजूनही पाऊस सुरूच असून, पावसाची सरासरी अन टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे. मात्र जिल्ह्यातील ज्या ज्या भागातील रस्ते अद्याप बनविण्यात आले नाहीत अशा भागातील नागरिकांना मात्र ये जा साठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.