हिंगोली - बुधवारी सायंकाळी हिंगोली प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर तसेच कोरोना वार्डमध्ये उपचार घेत असलेल्या 11 जणांचा अहवाल हा निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर नव्याने 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचेही अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता एकूण 28 कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत.
पॉझिटिव्ह अहवाल आल्यापैकी हिंगोली तालुक्यातील लिंबाळा येथील 9 जणांचा समावेश आहे. हे सर्व मुंबई येथून हिंगोली जिल्ह्यात आले होते. यामध्ये कलगाव 6, सिरसम बु 1, सेनगाव तालुक्यातील ब्राह्मण वाडा 1, कळमनुरी तालुक्यातील सुकळी येथील एका जणांचा समावेश आहे. तर बरे झालेल्यांमध्ये हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील 2, औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा आणि वसमत येथील कोरोना केअर सेंटर मधील आठ जणांचा समावेश आहे. हट्टा 2, गिरगाव 2 कुरूडवाडी 1, हयातनगर 1, कवठा 1, वसमत शहर 1 यांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात 210 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटरमध्ये 2 हजार 637 व्यक्तींना दाखल केले होते. त्यापैकी 2 हजार 201 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 2 हजार 231 जणांना सुट्टी दिलेली आहे. आता 397 दाखल असून, 195 जनांचे अहवाल हे येणे बाकी आहेत.