हिंगोली - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण संख्या प्रचंड वाढ होत आहे. हिंगोली प्रशासनाला प्राप्त झालेल्या वाहनांमध्ये पुन्हा 22 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. एकंदरीतच जिल्ह्यात 433 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 319 रुग्णही बरे झाले आहेत. तर 113 रुग्णावर विविध कोरोना केअर सेंटर तसेच कोरोना वार्डमध्ये उपचार सुरू आहेत. वाढत्या रुग्ण संख्येने हिंगोली कर आता चांगलेच हादरून गेले आहेत.
नव्याने आढळलेल्या रुग्णात कळमनुरी शहरातील भाजी मंडई भागात सहा रुग्ण आढळले आहेत. तर वसमत शहरातील अशोक नगर भागात दोघे, शुक्रवार पेठ येथील एक आणि आझम कॉलनी भागात एक हे सर्व रुग्ण कोरोनाबाधित रुग्णाच्या जवळच्या संपर्कात आलेले आहेत. हिंगोली शहरातील श्रीनगर कॉलनी भागात सारीच्या अजराने त्रस्त झालेला रुग्ण हा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आहे. हिंगोली कासारवाडा येथील एक रुग्ण तर जिल्हा परिषद कार्यालयातील आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व जण कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले आहेत. तर तलाब कट्टा परिसरात कंटेन्मेंट कोविड अँटीजन टेस्टमध्ये 5 जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटीव्ह आढळलेले आहेत. तर हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सारीच्या आजाराने दाखल झालेल्या सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून त्याचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सदरील रुग्ण हा कळमनुरी तालुक्यातील कळमकोंडा येथील रहिवासी आहे. एकंदरीतच आज घडीला हिंगोली जिल्ह्यात 433 कोरोनाबाधित रुग्ण संख्येची नोंद झालेली आहे.
यापैकी 319 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झालेले आहेत, त्यांना प्रशासनाने सुट्टी दिली असून आज घडीला 113 कोरोना बाधित रुग्णांवर कोरोना केअर सेंटर तसेच कोविड वार्डमध्ये उपचार सुरू आहेत. अचानक कोरनाबाधित रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने हिंगोलीकरांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे असले तरीही जिल्ह्यात शहरी ठिकाणी मात्र गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.