ETV Bharat / state

हिंगोलीतील नवविवाहितेची आत्महत्या; फेब्रुवारीत झाले होते लग्न

हिंगोलीतील एका नवविवाहित महिलेने गळफास घेत आपले जीवन संपवले. आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ट आहे. तर गेल्या महिन्यातच या महिलेचा विवाह झाला होता.

मृत कोमल सोनवणे
मृत कोमल सोनवणे
author img

By

Published : Mar 20, 2020, 9:11 PM IST

हिंगोली - एका नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कोमल सोपानराव सोनवणे (रा. टेंभुर्णी, ता. वसमत) असे या मृत महिलेचे नाव आहे.

हिंगोलीतील नवविवाहितेची आत्महत्या; फेब्रुवारीत झाले होते लग्न

कोमलचा बालाजी धारोजी राऊत (रा. अर्धापूर, ता. नांदेड) याच्यासोबत 2 फेब्रुवारीला विवाह झाला होता. टेंभुर्णी याठिकाणी मोठ्या उत्साहात हा विवाह सोहळा पार पडला. यानंतर नवविवाहित कोमल सासरी गेली आणि परत माहेरी आली होती. दरम्यान, या नवविवाहित दाम्पत्यामध्ये फोनवर कडाक्याचे भांडण झाले. अशातच घरात कोणी नसल्याचे पाहून कोमलने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ट आहे. तसेच याप्रकरणी अजून कोणतीही नोंद झाली नाही. मात्र, नवविवाहितेने अवघ्या महिनाभरात आत्महत्या केल्यामुळे गावांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - बंदमधून शेअर बाजाराला वगळले; बँकांचेही व्यवहार राहणार सुरू

दरम्यान, सासरची मंडळी टेंभुर्णी येथे आली नसल्याने माहेरच्या मंडळीनी मृतदेह ताब्यात घेण्यास स्पष्ट नकार दिला. थोड्या वेळाने सासरची मंडळी दाखल झाली आणि आपापसातील वाद मिटविल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. तसेच विवाहितेचे नातेवाईक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, अर्धवट तक्रार दाखल करून नातेवाईकांनी पोलीस ठाण्यामधून काढता पाय घेतला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.