ETV Bharat / state

हिंगोली : अद्ययावत प्रयोगशाळा; दिवसाचे काम आले तासांवर

author img

By

Published : Nov 14, 2020, 3:17 PM IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेल्या या विषाणू संशोधन आणि प्रयोगशाळेत जिल्हाधिकारी रुचेश जयवांशी, जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार आणि जिल्हा शल्यचिकित्सक राजेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन शिफ्टमध्ये नमुने तपासणीचे काम सुरू आहे. यामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञ कार्यरत असून, जिल्हाभरातून कोरोनाचे आलेले नमुने या ठिकाणी अतिशय सुनियोजन पद्धतीने स्वीकारुन त्यावर प्रयोगशाळेमध्ये योग्य ती प्रक्रिया केली जाते.

new covid sample testing lab in hingoli
कोविड नमुने प्रयोगशाळा

हिंगोली - जिल्ह्याची मागासलेला जिल्हा म्हणून सर्वत्र ओळख आहे. मात्र, कोरोना महामारीच्या काळात या जिल्ह्यात अद्यावत प्रयोगशाळा उभारण्यात आल्या. या प्रयोगशाळांमुळे दिवसाचे काम आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. जिल्ह्यासाठी विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा एक प्रकारे संजीवनीच ठरत आहे. पूर्वी नमुने तपासणीसाठी गेल्यानंतर दोन ते तीन दिवसांचा कालावधी अहवाल प्राप्त होण्यासाठी लागत असे. मात्र, आता फक्त सहा तासात अहवाल प्राप्त होत आहे. यामुळे पुढील प्रक्रिया ही वेळेत पार पाडत आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेल्या या विषाणू संशोधन आणि प्रयोगशाळेत जिल्हाधिकारी रुचेश जयवांशी, जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार आणि जिल्हा शल्यचिकित्सक राजेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन शिफ्टमध्ये नमुने तपासणीचे काम सुरू आहे. यामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञ कार्यरत असून, जिल्हाभरातून कोरोनाचे आलेले नमुने या ठिकाणी अतिशय सुनियोजन पद्धतीने स्वीकारुन त्यावर प्रयोगशाळेमध्ये योग्य ती प्रक्रिया केली जाते. अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या-त्या रुग्णालयाला पाठविण्यासाठी अहोरात्र तज्ञ मंडळी झगडत आहे. पूर्वी हीच प्रक्रिया औरंगाबाद, नांदेड या ठिकाणी पार पडत होती. त्या ठिकाणी इतरही जिल्ह्यातील नमुने येत असल्याने, दोन-दोन दिवस लागत होते. त्यामुळे हिंगोलीचा नंबर लागण्यासाठी दिवस मोजावे लागत. आता मात्र या प्रयोगशाळेमुळे काही तासांमध्ये ही प्रकिया पार पडत आहे.

नवीन टीम असल्याने तपासणीसाठी लागतोय वेळ -

या प्रयोगशाळेमध्ये कार्यरत असलेली टीम अनुभवी जरी असली तरी, या ठिकाणी अतिशय बारकाईने नियोजन करून, काम केले जात आहे. अद्ययावत दाखल झालेल्या नवनवीन यंत्राची माहिती घेत, प्रकियेनुसार नमुने तपासणी केली जात आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी दाखल झालेल्या आधुनिक मशीन स्वयंचलित असून, त्यामध्ये गोंधळून जाण्यासारखे काही ही नाही. फक्त ज्याप्रमाणे मशीनमध्ये सेटिंग केली आहे तितकीच आपल्याला स्वॅब टाकत असताना काळजी घ्यावी लागते, अशी माहिती डॉ. लखमावार यांनी दिली.

हेही वाचा - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, गर्दीमुळे वस्तूंच्या दरात वाढ

स्वॅब गोळा करण्यासह तपासण्याची पद्धत -

याठिकाणी नमुने गोळा करण्यापासून ते अहवाल देण्यापर्यंत फार काळजीपूर्वक नियोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणांवरून आलेले नमुने एका खिडकीत गोळा केले जातात. त्या विभागात कार्यरत असलेला पीपीई किटमध्ये असलेला कर्मचारी शीतपेटी आलेले नमुने घेऊन, त्यावरील नावाची शहानिशा करून, गळती आहे की नाही याची बारकाईने पाहणी केली जाते. जर गळती असेल तर तो नमुना बाद ठरवला जातो. नंतर एस.आर.पी आयडी, मोबाईल नंबर, ठिकाण याबाबी पहिल्यानंतर कुठे ते नमुने घेतले जातात. त्यावर प्रयोग शाळेतील कर्मचारी, नोंद करून पुढील प्रक्रियेसाठी नमुने पाठविले जातात. आतापर्यंत 272 नमुने तपासणी केले असून, त्यापैकी 174 निगेटिव्ह तर 74 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्याची माहिती डॉ. संजीवन लखमावर यांनी दिली.

आरएफए रूममध्ये केली जाते प्रक्रिया -

प्रयोगशाळेमध्ये नमुन्याची नोंद झाल्यानंतर त्यावर योग्य ती प्रक्रिया करून हे नमुने पीपीटीमध्ये राहणारी व्यक्ती पुढील प्रक्रियेसाठी बायो सेफ्टीमध्ये पाठवली जाते. याठिकाणी पाच प्लेट बनवल्यानंतर स्वयंचलित असलेल्या यंत्रात प्रक्रिया पार पडल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी नमुने मास्टर मिक्स रूममध्ये पाठविले जाते. या ठिकाणी अर्धा तासाची प्रक्रिया असते. मास्टर मिक्स प्लेटमध्ये एकूण 93 नमुने एका वेळी तपासले जातात. नंतर पीसीआर रुममध्ये असलेल्या पिडीआर हूडमध्ये प्रक्रिया होऊन आरएनए झालेल्या लेबलनुसार 45 मिनिटांची प्रक्रिया पार पडते. यानंतर शेवटी यंत्रात प्लेट लोड होते. या प्रकियेला सव्वा तास वेळ लागतो.

मास्टर मिक्स रूम अति महत्वाची -

या प्रयोगशाळेमध्ये अति महत्त्वाचा गाभा म्हणजे मास्टर मॅक्स रूम आहे. सर्वत्र प्रक्रिया पार पाडून आल्यानंतर नमुने या ठिकाणी आणले जातात. जवळपास अर्धा तासाची ही प्रक्रिया आहे. येथून अहवाल मिळताच नंतर जेथून जेथून प्राप्त झालेले अहवाल आहेत त्या त्या ठिकाणी रिपोर्टिंग केली जाते.

या ठिकाणी ही राबतेय टिम -

अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी व प्रशासनाने पुढाकार घेतला होता. यामध्ये प्रामुख्याने खासदार राजीव सातव यांनी या प्रयोग शाळेसाठी विशेष लक्ष घातले होते. त्याला यश प्राप्त झाले आहे. नव्याने उभारलेल्या प्रयोग शाळेत जिल्हा शल्यचिकित्सक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मायक्रो बायोलॉजिस्ट डॉ. संजीवन लखमावार हे प्रयोगशाळेचे प्रमुख म्हणून तर डॉ. अरुण जिरवनकर, डॉ. शिबा तालिब हे सहाय्यक प्रयोगशाळा प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. यासोबतच येथे 12 तंत्रज्ञ कार्यरत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.