हिंगोली - जीएसटीतील किचकट तरतुदी रद्द करण्याच्या मागणीसाठी आज देशव्यापी आंदोलन सुरू आहे. त्याच धर्तीवर हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर सल्लागार संघटना व व्यापाऱ्यांनी यांनी आंदोलन सुरू केले आहे.
जिल्हाभरातून व्यापारी व कर सल्लागार सहभागी
हिंगोलीत व्यापारी व कर सल्लागार संघटनेकडून जीएसटी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनात जिल्हाभरातून व्यापारी व कर सल्लागार सहभागी झाले आहेत. जीएसटीमध्ये देशातील सव्वा कोटींहून अधिक व्यापाऱ्यांनी नोंदणी केली आहे. परंतु प्रत्यक्षात कर भरताना ही साइट चालत नाही. जीएसटी येवून साडेतीन वर्षे झाली आहेत, परंतु यामध्ये ३००वेळा दुरूस्ती झाली.
शासनविरोधी घोषणाबाजी
सरकारने आधी एकदाच काय त्या दुरूस्ती करून घ्याव्यात, व्यापारी व कर सल्लागारांना अडचणीत टाकू नये, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी शासनविरोधी घोषणाबाजी करण्यात आली.