हिंगोली - जिल्ह्यात औंढा नागनाथ, कळमनुरी तालुक्यात अनेक भागात मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. लातूर येथील भूमापक वेधशाळेने या भूकंपाची तीव्रता 3.3 रिस्टर स्केल इतकी असल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ या भागात गेल्या तीन ते चार वर्षांपासून अधून-मधून भूकंपाचे धक्के जाणवतात. रात्रीच्या वेळेलाही जमिनीतून गुढ आवाज येत असतो. यामुळे काही नागरिक जीव वाचविण्याच्या भीतीपोटी घराच्या बाहेरच मुक्काम करतात. भूकंप झाल्यानंतर प्रशासनाचे अधिकारी संबंधित गावात जाऊन तेथील ग्रामस्थांना मार्गदर्शन करतात.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : स्वतःचं घरं केलंय क्वारंटाइन सेंटर, पिसादेवी गावातील तरुणाचा स्तुत्य उपक्रम
दरम्यान, काही दिवसांपूर्वीही या भागात जमिनीतून आवाज येत होता.