ETV Bharat / state

हिंगोलीत व्यापाऱ्यावर हल्ला, चोरट्यांनी धारदार शस्त्राने केले वार

हिंगोलीतील सेनगाव पोलीस ठाणे हद्दीत सर्वाधिक जास्त लुटमारीच्या घटना घडत आहेत.

author img

By

Published : May 19, 2019, 11:56 AM IST

जखमी व्यापारी

हिंगोली - सेनगाव पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी चोरट्याने व्यापाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात व्यापारी जखमी झाला आहे. सत्यनारायण कचरूलाल झंवर, असे हल्ला झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

मागील काही दिवसांपासून शहरात चोरी आणि लुटमारीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषतः सेनगाव पोलीस ठाणे हद्दीत सर्वाधिक जास्त लुटमारीच्या घटना घडत आहेत. तरीही पोलिसांना या चोरट्यांना पकडण्यात अपयश येत आहे.

जखमी व्यापारी

शनिवारी रात्री नेहमी प्रमाणे व्यापारी झंवर हे आपले जनरल स्टोअर्स बंद करून दुचाकीने घरी जात होते. घराजवळ पोहचले तोच दुचाकीवर आलेल्या चोरट्याने झंवर यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी व्यापाऱ्याने आरडा-ओरड करत बॅग देण्यास विरोध केला. मात्र, चोरट्याने त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. यात त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुःखात झाली. मात्र, त्यानी हातची बॅग सोडली नाही. आरडाओरडा केल्याने घरातील मंडळी आणि नागरिकांनी धाव घेतली तोपर्यंत चोरट्याने पळ काढला.

झंवर यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या हाताला पंचवीस टाके पडले आहेत. चोरट्यांचा वाढत्या हल्ल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ सेनगाव येथे व्यापाऱ्यांनी बंद पाळला आहे. हल्ला प्रकरणी रात्री उशिरा कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Intro:हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या अन लुटमरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. विशेषतः सेनगाव पोलीस ठाणे हद्दीत सर्वाधिक जास्त लुटमरीच्या घटना घडतं आहे. पुन्हा एकदा याच पोलीस ठाणे हद्दीत अन शहरातच रात्री साडे आठच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या चोरट्याने व्यापाऱ्या जवळील पैशाची बॅग पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यापाऱ्याने आरडा ओरड करत बॅग देण्यास विरोध केला. तर चोरट्याने त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र हाताने वार चुकविताना हातावर दोन वेळा वार करून चोरटे पसार झाले.या घटनेने मात्र व्यापाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सत्यनारायण कचरूलाल झंवर असे जखमी व्यापाऱ्याच नाव आहे.

Body:हिंगोली जिल्ह्यात चोरट्यांचा एवढा धुमाकूळ वाढला आहे की, चोरटे एका एका रात्रीत सात ते दहा दुकाने फोडत आहेत. सोबतच रस्तावरून जाणाऱ्या एकट्या दुकट्या वाटसरुला ही लुटत आहेत. आशा वेगवेगळ्या धाडसी चोऱ्या अन लूटमार करून जणू काय चोरटे पोलिसांना आव्हाहनच देत आहेत. सेनगाव पोलीस ठाणे हद्दीत तर बऱ्याच गंभीर घटना घडलेल्या असल्या तरी चोरट्याना ताब्यात घेण्यास सेनगाव पोलिसांना अपश येत आहे. रविवारी रात्री नेहमी प्रमाणे व्यापारी सत्यनारायण झंवर हे आपले जनरल स्टोअर्स बंद करून दुचाकीने घरी जात होते. घराजवळ पोहचले तोच दुचाकीवर आलेल्या चोरट्याने झंवर यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला विरोध करत व्यापाऱ्यांनी आरडाओरड केली. तर त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केला. यात डाव्या हाताला गंभीर दुःखात झाली. मात्र त्यानी हातची बॅग सोडली नाही. आरडाओरडा केल्याने घरातील मंडळी अन नागरिकांनी धाव घेतली तोपर्यंत चोरट्याने पळ काढला.

Conclusion:झंवर यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या हाताला पंचवीस टाके बसले आहेत. चोरट्यांचा वाढत्या हल्यामुळे व्यापारी चांगलेच हादरून गेले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ सेनगाव येथे व्यापाऱ्यांनी बंद पाळला आहे. हल्ला प्रकरणी रात्री उशिरा कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

जखमी व्यापाऱ्याचे व्हिज्युअल ftp केले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.