ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी; औंढा तालुक्यातील गोजेगाव येथील घटना

रविवारी हिंगोलीचे तापमान चक्क ४६ अंशावर पोहोचले होते. अशातच औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथे एकाचा उष्मघाताने बळी गेला आहे. संतोष कुंडलिक नागरे (३९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मृत संतोष कुंडलिक नागरे
author img

By

Published : Apr 30, 2019, 7:55 AM IST

हिंगोली - जिल्ह्याचे तापमान मागील तीन ते चार दिवसांपासून ४३ ते ४५ अंशावर पोहोचले असून रविवारी तर विक्रमच झाला आहे. रविवारी तापमान चक्क ४६ अंशावर पोहोचले होते. याचा नागरिकांच्या जीवनावर अधिक परिणाम होत आहे. अशातच औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथे एकाचा उष्मघाताने बळी गेला आहे. संतोष कुंडलिक नागरे (३९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

नागरे हे गेल्या अनेक वर्षापासून गुराख्याचे काम करतात. ते आणि गावातीलच एक व्यक्ती गुरे राखण्याचे काम करतात. नेहमी प्रमाणे नागरे हे साळणा परिसरातील माळरानात गुरे चारण्यासाठी गेले होते. गुरे चारत असताना दुपारच्या वेळी नागरे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते एका झाडाखाली झोपले होते. त्यांच्या सोबत असलेले बालाजी सांगळे याने नागरे यांच्या घरी संपर्क साधला अन नागरे यांची प्रकृती बिघडल्याचे सांगितले.

नातेवाईकाने शेतात धाव घेऊन नागरे यांना घरी आणले. तर त्यांना जास्तच त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना दुचाकीने रुग्णालयात नेले जात होते. गावापासून काही अंतरावर गेल्यानंतर नागरे यांच्या छातीत जास्तच कळा येत असल्याने त्यांचा गाडीवरून तोल जात होता. त्यामुळे त्यांना गाडीवरून उतरवून एका वाहनाने औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून नागरे यांना मृत घोषित केले.

वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत होत चालले आहे. दुपारच्या वेळी तर असह्य तापमान जाणवत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने केले जात आहे. नागरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, आई- वडील, भाऊ असा परिवार आहे. औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, उष्णघाताने एकाचा बळी गेल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Intro:हिंगोली जिल्ह्याचे तापमान मागील तीन ते चार दिवसांपासून ४३ ते ४५ अंशावर पोहोचले असून आज तर विक्रमचा झाला आहे. चक्क ४६ अंशावर तापमान पोहोचले होते. याचा नागरिकांच्या जीवनावर अधिक परिणाम होत आहे. अशाचत ओंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथे एकाचा उष्मघाताने बळी गेलाय. संतोष कुंडलिक नागरे (३९) असे मयताचे नाव आहे.

Body:नागरे हे गेल्या अनेक वर्षापासून गुराख्यांचे काम करतात. ते आणि गावातीलच एक व्यक्ती गुरे राखण्याचे काम करतात. ते नेहमी प्रमाणे साळणा परिसरातील माळरानात गुरे चारण्यासाठी गेले होते. गुरे चारत असताना दुपारच्या वेळी नागरे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते एका झाडाखाली झोपले होते. त्यांच्या सोबत असलेले बालाजी सांगळे यांने नागरे यांच्या घरी संपर्क साधला अन नागरे यांची प्रकृती बिघडल्याचे सांगितले. नातेवाइकांने शेतात धाव घेऊन नागरे यांना घरी आणले. तर त्याना जास्तच चकरा येत होत्या, त्यामुळे त्याना दुचाकीने रुग्णालयात नेले जात होते. तर गावापासून काही अंतरावर गेल्यानंतर नागरे यांच्या छातीत जास्तच दुखत होते. ते दुचाकीवर बसले असता त्यांचा गाडीवर कोणाकडेही तोल जात होता. त्यामुळे त्याना गाडीवरून उतरवून एका वाहनाने ओंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून नागरे यांना मयत घोषित केले.

Conclusion:रविवारी ४६ अंशावर तापमानाचा पारा पोहोचला होता. तर अजून तीन दिवस असेच तापमान असण्याची नोंद आहे. वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत होत चालले आहे. दुपारच्या वेळी तर असस्य तापमान जाणवत असल्याने, उकाडा ही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नागरिकांनी काळजी घेण्याचे आव्हान आरोग्यविभागाच्या वतीने केले जात आहे. नागरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, आई- वडील भाऊ असा परिवार आहे. औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. मात्र उष्णघाताने एकाचा बळी गेल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मयत नागरे यांचा फोटो मेल केला आहे. तो बातमीत वापरून घ्यावा.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.