हिंगोली - जिल्ह्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू झाला असल्याने, हिंगोलीचे प्रशासन खूपच सतर्क झाले आहे. त्यातच स्वतः जिल्हाधिकारी अन मुख्य कार्यकारी अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने जास्तच काळजी घेतली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी औषध विक्रते, व्यापारी यांची अँटीजन टेस्ट घेण्याचे बंधनकारक केले होते. तपासणीचे वेळापत्रक जाहीर केल्यानुसार औषध विक्रेत्यांनी तपासणी करून घेतली होती. त्यात निगेटिव्ह आलेल्याना औषधं दुकान उघडण्यास परवानगी दिल्याचे आदेश काढले आहेत.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे हिंगोलीचे प्रशासन हे पूर्णपणे हादरून गेले आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठे कोरोना बाधित रुग्ण आढळून येईल त्याचा काही नेमच नसल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सर्वत्र अँटीजन तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार आरोग्य विभागाने तपासणीसाठी डॉक्टरांची पथके नेमून त्या भागामध्ये तपासणी केली आहे.
यामध्ये जे व्यापारी तसेच औषध विक्रेते ज्याची तपासणी निगेटिव्ह आली आहे. त्यांना औषधाचे दुकान उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र सर्वप्रथम निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र त्या औषध विक्रेत्यांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान औषधे विक्रीची दुकाने उघडी झाल्यानंतर मात्र नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मदत होणार आहे.