हिंगोली - स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांनी गडचिरोली भागात तीन वर्षे खडतर सेवा दिली. पूर्ण केलेल्या सेवेबद्दल घेवारे यांना आज आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर झाले. घेवारे यांच्यावर हिंगोली पोलीस दलातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
घेवारे हे मुरकूटडोह येथील सशस्त्र पोलीस दुरक्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी आदिवासी तरूणांचे मत परिवर्तन करुन त्यांना पोलीस दलामध्ये भरती केले होते. तसेच त्यांनी अनेक गावे नक्षलमुक्त करत गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्त्यांचे बांधकाम करून दिले. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना पदक जाहीर झाले.
अतिशय बिकट परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनाच केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे हे पदक जाहीर केले जाते. घेवारे यांच्यासोबत महाराष्ट्रातील इतर काही पोलीस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे.