ETV Bharat / state

मूल होईना म्हणून हिंगोलीच्या दाम्पत्याची विष पिऊन आत्महत्या? - hospital

रमेश दत्तराव काचेवर (५२), रेखा रमेश काचेकर (४५) असे या दाम्पत्याचे नाव आहे.हे दोघे हिंगोली येथे एका भाड्याच्या खोलीत संसाराचा गाडा हाकत होते. या दाम्पत्याच्या आत्महत्येने हिंगोली जिल्ह्यात खळबळ उडाली असून शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मूल होईना म्हणून हिंगोलीच्या दाम्पत्याची विष पिऊन आत्महत्या केली आहे.
author img

By

Published : Jun 2, 2019, 10:17 PM IST

Updated : Jun 2, 2019, 11:10 PM IST

हिंगोली- शहरातील एका दाम्पत्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मूल बाळ होत नसल्याच्या निराशेतूनच दोघांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज लावला जात आहे. पूर्णा-नांदेड रोडवर पती-पत्नीचा मृतदेह आढळून आल्याने घटनास्थळी एकच गर्दी झाली होती. रमेश दत्तराव काचेवर (५२), रेखा रमेश काचेकर (४५) असे या दाम्पत्याचे नाव आहे.

रमेश काचेकर आणि त्यांची पत्नी रेखा काचेकर हे दोघे हिंगोली येथे एका भाड्याच्या खोलीत संसाराचा गाडा हाकत होते. दोघे पती-पत्नी तीन दिवसांपूर्वी शिर्डी येथे साई दर्शनासाठी गेले होते. ते दर्शन करून परभणी येथे परतल्याचे मृत रमेश यांनी आपल्या हिंगोलीतील बंधू नागनाथ काचेकर यांना फोनद्वारे कळविले. सकाळी आम्ही पोहोचणार असल्याचे सांगितले, अन तेवढेच शब्द भावाच्या कानी पडले. त्यानंतर दुपारी दोघांचेही मृतदेह पूर्णा तालुक्यातील अडगाव परिसरात आढळून आल्याची माहिती मिळाल्याचे मृताचे बंधू नागनाथ काचेकर यांनी दिली. मृतदेहा शेजारी विषारी औषधाची बाटली आढळून आली.

याविषयी माहिती मिळताच चुडावा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर मृत दाम्पत्याकडे असलेल्या मोबाईलवर आलेल्या कॉल वरून पोलिसांनी संपर्क साधला. यावरूनच दाम्पत्याची ओळख पटली. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचेही मृतदेह पूर्णा येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविले. शवविच्छेदन करून दोघांचेही मृतदेह सुरेश दत्तात्रय काचेकर यांच्याकडे स्वाधीन केले. या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

हे कुटुंब अतीशय गरीब होते. मात्र, देवाचा धावा खुप करत होते. या घटनेमुळे हिंगोली जिल्ह्यात खळबळ उडाली असून शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास नामदेव सुजू हे करीत आहेत.

ही बातमी मोजो वरून अपलोड केली आहे.          रीअपलोड झालेली बातमी घ्यावी

Last Updated : Jun 2, 2019, 11:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.