ETV Bharat / state

विना परवानगी थाटामाटात विवाह सोहळा पडला महागात; वधू वरासह वऱ्हाडी मंडळींवर गुन्हा दाखल - Corona pandemic and marriage

हिंगोली जिल्ह्यात सार्वजनिक कार्यक्रम तसेच विवाह सोहळ्याला परवानगी नाकारलेली असतानाही कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या शिरडशहापूर येथे थाटामाटात विवाह सोहळा आटोपनाऱ्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारला तर शेकडो लोक उपस्थित असल्याचे दिसून आले. त्यामुळे वधू वरासह वऱ्हाडी मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 हिंगोली लग्न कारवाई न्यूज
विना परवानगी थाटामाटात विवाह सोहळा उरकने पडले महागात; वधू वरासह वऱ्हाडी मंडळींवर गुन्हा दाखल
author img

By

Published : May 31, 2021, 8:07 PM IST

हिंगोली - सध्या कोरोना महामारीने प्रत्येकाला भांबावून सोडले आहे. दिवसेंदिवस वाढती कोरोनाची रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात सार्वजनिक कार्यक्रम तसेच विवाह सोहळ्याला परवानगी नाकारलेली असतानाही कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या शिरडशहापूर येथे थाटामाटात विवाह सोहळा आटोपनाऱ्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारला तर शेकडो लोक उपस्थित असल्याचे दिसून आले. त्यामुळे वधू वरासह वऱ्हाडी मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अफरोज खान सिकंदर खान पठाण तर सयद रुकसाना स. मनान अशी वधू वरांची नावे आहेत. सदरील वधू वरांचा विवाह सोहळा हा कोरोनाचे नियम डावलून थाटामाटात साजरा करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती पोलीस प्रशासनास मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे एक विशेष पथक तयार केले. पथकाने अगदी खात्रीशीर माहिती करुन सदरील ठिकाणी जाऊन छापे मारला तर यामध्ये विवाह सोहळा हा मोठ्या थाटामाटात सुरू असून त्यामध्ये शेकडो वऱ्हाडी मंडळी जमली असल्याचे दिसून आले. या पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे शिवसांब घेवारे, कुरुंदा पोलीस ठाण्याचे सपोनि सुनील गोपीनवार, पोउपनी सविता बोधनकर, तलाठी गोपाल सीताराम मुकीर यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी विवाह स्थळी धाव घेऊन पाहणी केली. तर तेथे शेकडो जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळा सुरू असल्याचे दिसून आले. यामध्ये कोरोना नियमांचे पूर्णपणे उल्लंघन केल्याने वधू वरासह वऱ्हाडी मंडळीवर गुन्हा दाखल केला आहे.

अशी आहेत वऱ्हाडी मंडळीची नावे
आयोजक सय्यद मुजीप सय्यद अमीर (वधूचे मोठे चुलते), स. अनवर स. रजाक (वधूचे भाऊ), स. असीप स शब्बीर, स. जावेद स मुजु सर्व रा. शिरडशहापूर, शेख माजिद शेख नजीर रा. वसमत, स सोयब स नसीम रा. शिरडशहापुर, सयद रूकसाना स मनानं (वधू), फेरोजखान सिकंदरखान पठाण (नवरदेवाचा भाऊ), अफरोज खान सिकंदर खान पठाण (नवरदेव), मुर्तुजा काझी (लग्न लावणारे), शेख शफियोद्दीन जे .के. टेंट. हाऊस शिरडशहापूर व इतर 150 ते 200 लोकांविरुद्ध कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दहा लोकांना करण्यात आली अटक तर उर्वरित लोकांनी काढला पळ
गुन्हा दाखल झालेल्या पैकी एकूण दहा जणांना कुरुंदा पोलिसांनी अटक केली आहे. तर उर्वरित लोक मात्र गर्दीचा फायदा घेऊन पळून गेले आहेत. मात्र लग्नातील व्हिडीओ व फोटो यांच्या मार्फत लग्नात हजर असलेल्या वर्‍हाडी मंडळीच्या शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी वेगळी दोन पथके तयार केली आहेत. त्यामुळे आता विवाह सोहळा साजरा करण्यासाठी आलेल्यांना पळता भुई थोडी झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.