ETV Bharat / state

मामाच्या भेटीसाठी गेलेल्या भाच्याचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू - man died by drowning in hingoli

रविवारी पिंपराळा येथे मामाच्या भेटीसाठी दोन मित्रांसह निघालेला मारोती कचरू खबाले याचा वरदडी येथील ओढ्याला आलेल्या पुरात दुचाकीसह वाहून गेल्याने मृत्यू झाला.

मामाच्या भेटीसाठी गेलेल्या भाच्याचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू
author img

By

Published : Oct 29, 2019, 11:56 AM IST

हिंगोली - वसमत तालुक्यातील पिंपराळा येथे मामाच्या भेटीसाठी दोन मित्रांसह निघालेला भाच्याचा ओढ्याला आलेल्या पुरात दुचाकीसह वाहून गेल्याने मृत्यू झाला. तर, इतर दोघांना पोहायला येत असल्याने ते बचावले. मारोती कचरू खबाले(२२) रा. गोटेवडी असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली होती. मारोतीचा दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला. रात्रभर मृतदेह पाण्यात असल्याने, मृतदेह पूर्णपणे कुजला होता. या प्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

मामाच्या भेटीसाठी गेलेल्या भाच्याचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू

मारोती हा दुचाकीने (एम.एच. १४ एफ.एल ९५४१) दिवाळी निमित्त आकाश बेले अन ज्ञानेश्वर बेले या दोन मित्रांसमवेत पिंपराळा येथे असलेल्या मामाकडे निघाला होता. मात्र, पाऊस सुरू असल्याने ते तिघे शिरळी येथील आपल्या नातेवाईकांच्या घरी थांबले होते. तेथे त्यांनी जेवण आटोपले अन पिंपराळा मार्गे निघत होते. पण, पाऊस जोरात सुरू असल्याने नातेवाईकांनी त्यांना थांबण्याची विनवणी केली होती. मात्र, त्याने नातेवाईकांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. अन् ते तिघे दुचाकी घेऊन पिंपराळा मार्गे निघाले.

हेही वाचा - डोहात बुडून दोन मेंढपाळांच्या मुलांचा मृत्यू

गावापासून काही अंतरावर जाताना वरदडी येथील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला अन् यात दुचाकीसह तिघेजण वाहून गेले. आकाश अन ज्ञानेश्वरला पोहणे येच असल्यामुळे ते बाहेर निघाले, मात्र मारोती पाण्याच्या प्रवाहासह पुढे वाहत गेला. घाबरलेल्या स्थितीत मारोतीच्या दोन मित्रांनी शिरळी गाठली अन् मारोती पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती नागरिकांना दिली. लागलीच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मारोतीचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. मात्र, मारोती सापडला नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे पुन्हा शोधमोहीम सुरू केली असता मारोतीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. तर काही अंतरावर दुचाकी आढळून आली.

पिंपराळा येथील मामाची राहिली अधुरी भेट

पिंपराळा येथील मामाच्या भेटीसाठी मोठ्या आतुरतेने निघालेल्या मारोतीचा नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. त्यामुळे पिंपराळा येथील मामाची अन् मारोतीची भेट अर्धवट राहिली. मारोतीच्या मृत्यूमुळे मामाच्या गावात व गोटेवाडीत शोककळा पसरली आहे. कुरुंदा पोलीस ठाण्याचे सपोनि एरेकर, पोलीस कर्मचारी भोपे व वाकळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शेवविच्छेदनासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.

हेही वाचा - हिंगोली : परतीच्या पावसाचा हाहाकार, कयाधु नदीचा बंधारा फुटला

हिंगोली जिल्ह्यात मागील ४ ते ५ दिवसांपासून पावसाची संततधार असल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर, रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्याची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

हेही वाचा - औंढा नागनाथ येथे तीन दिवसीय दिवाळी महोत्सव; अलंकार पूजा पाहून व्हाल थक्क..

Intro:
हिंगोली- वसमत तालुक्यातील पिंपराळा येथे असलेल्या मामाच्या भेटीसाठी दोन मित्रांसह निघालेला भाच्याचा ओढ्याला आलेल्या पुरात दुचाकीसह वाहून गेल्याने मृत्यू. तर दोघांना पोहोणे असल्याने, ते बाहेर निघण्यात यश आले. ही घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली होती. भाच्याचा दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला. रात्रभर मृतदेह पाण्यात असल्याने, मृतदेह पुर्णपणे कुजला होता. या प्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केलीय.

Body:मारोती कचरू खबाले(२२) रा. गोटेवडी अस मयताच नाव आहे. मारोती हा एम. एच. 14 एफ. एल. 9541 या क्रमांकाच्या दुचाकीने दिवाळी निमित्त आकाश बेले अन ज्ञानेश्वर बेले या दोन मित्रांसमवेत मारोती हा पिंपराळा येथे असलेल्या मामाकडे निघाला होता. मात्र पाऊस सुरू असल्याने तो शिरळी येथील आपल्या नातेवाईकांच्या घरी थांबले होते. तेथे त्यांनी जेवण आटोपले अन पिंपराळा मार्गे निघत होते. मात्र जोरात पाऊस सुरू सुरु असल्याने नातेवाईकाने त्याना थांबण्याची विनवणी केली होती. परंतु त्याने नातेवाईकाच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. अन तो दुचाकी घेऊन पिंपराळा मार्गे निघाला. गावापासून काही अंतरावर जातात तोच वरदडी येथील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला अन यात दुचाकीसह तिघेजण वाहून गेले. आकाश अन ज्ञानेश्वरला पोहणं असल्यामुळे ते बाहेर निघाले, मात्र मारुतीला पोहोणे नसल्याने तो पाण्याच्या प्रवाहासह पुढे वाहत गेला. घाबरलेल्या स्थितीत त्या दोन मित्रांनी शिरळी गाठली अन मारोती पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती नागरिकांना दिली. लागलीच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मारोतीचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. मात्र मारोती सापडला नाही. पहाटे पहाटे पुन्हा शोधमोहीम सुरू केली असता मारोतीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत तर काही अंतरावर दुचाकी आढळून आली.
Conclusion:
*पिंपराळा येथील मामाची राहिली अधुरी भेट*

पिंपराळा येथील मामाच्या भेटीसाठी मोठ्या आतुरतेने निघालेल्या मारोतीचा नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झालाय. त्यामुळे पिंपराळा येथील मामाची अन मारोतीची अधुरी भेट राहिली. मारोतीच्या मृत्यूमुळे मामाच्या व गोटेवाडित शोककळा पसरली आहे. घटनास्थळी कुरुंदा पोलीस ठाण्याचे सपोनि एरेकर, पोलीस कर्मचारी भोपे व वाकळे यांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शेवविच्छेदनासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.
हिंगोली जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाची संततधार असल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत तर रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्याची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.