ETV Bharat / state

हिंगोलीत वादळी पावसामुळे शेतमालासह खत भिजले, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - वादळी वारा

शनिवारी हजेरी लावलेल्या पावसाने हिंगोली येथे हळद विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनातील हळद पूर्णतः भिजली.

शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी आणलेले ट्रक
author img

By

Published : Jun 8, 2019, 3:13 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात सलग ४ ते ५ दिवसापासून वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत आहे. शनिवारी हजेरी लावलेल्या पावसाने हिंगोली येथे हळद विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनातील हळद पूर्णतः भिजली. कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेर रांगा लावलेल्या वाहनातील हळद झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली होती. तर मालगडीने हिंगोलीत दाखल झालेले २०:२०:० दहा हजार क्विंटल खत ही भिजल्याचा प्रकार घडला.

हळद विक्रीसाठी जमलेले शेतकरी

संत नामदेव हळद मार्केट मध्ये हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे येथे वाहनांच्या रांगा लावून, नंबर प्रमाणे वाहने यार्डात सोडली जातात. त्यामुळे दुपार पासूनच हळद मार्केट परिसरात वाहनांच्या रांगा लागतात. या रांगा एवढ्या कधी कधी शासकीय विश्रामगृहापर्यंत तर दुसऱ्या बाजूने रेल्वे स्टेशनमागील मोकळ्या परिसराने भरून जातात. अशीच परिस्थिती शुक्रवारी होती. पाऊस आल्यामुळे लांबलचक रांगेत थांबलेल्या शेतकऱ्यांनी आप-आपल्या वाहनातील हळद झाकून ठेवण्यासाठी घाई करत होते. या पावसामुळे शेतकऱयांचे खूप नुकसान झाले.

पावसामुळे हळद मार्केटमध्ये असलेली हळद भिजली. खरीपाची पेरणी तोंडावर असल्याने, शेतकरी हळद विक्रीसाठी धडपड करीत आहेत. मात्र, पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडविली. हळद भिजल्याने हळदीला कमी भाव मिळण्याची शक्यता असल्याचे काही शेतकरी सांगत होते. तर दुसरीकडे रेल्वेने आलेले हिंगोली रेल्वेस्थानकावर खत देखील भिजले. त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यावर दुहेरी संकट ओढवले आहे.

Intro:हिंगोली जिल्ह्यात सलग चार ते पाच दिवसापासून वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत आहे. शनिवारी हजेरी लावलेल्या पावसाने हिंगोली येथे हळद विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनातील हळद पूर्णतः भिजली. कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेर रांगा लावलेल्या वाहनातील हळद झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली होती. तर मालगडीने हिंगोलीत दाखल झालेले वीस वीस झीरो दहा हजार क्विंटल खत ही भिजल्याचा प्रकार घडला.

Body:हिंगोली येथील संत नामदेव हळद मार्केट मध्ये हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे येथे वाहनांच्या रांगा लावून, नंबर प्रमाणे वाहने यार्डात सोडली जातात. त्यामुळे दुपार पासूनच हळद मर्केट परिसरात वाहनांच्या रांगा लागतात. ह्या रांगा एवढ्या लांब लागतात, कधी कधी शासकीय विश्रामगृहा पर्यन्त तर दुसऱ्या बाजूने रेस्टशन निवासस्थाना मागील ही मोकळा परिसर वाहनाने पूर्ण भरून जातो. अशीच परिस्थिती शुक्रवारी होती. लांबलचक रांगेत थांबलेल्या शेतकऱ्यांनी आप - आपल्या वाहनातील हळद झाकून ठेवण्यासाठी शेतकरी एकच घाई करताना दिसत होते.तसेच रस्त्याच्या कडेला वाहनाच्या रांगा लागल्या मुळे ही या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला.

Conclusion:तसेच हिंगोली येथील हळद मर्केट मध्ये असलेली हळद भिजली. खरिपाची पेरणी तोंडावर असल्याने, शेतरी हळद विक्रीसाठी धडपड करीत आहेत. मात्र पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडविली. हळद भिजल्याने हळदीला कमी भाव मिळण्याची शक्यता असल्याचे काही शेतकरी सांगत होते. तर दुसरीकडे रेल्वेने आलेले हिंगोली रेल्वेस्थानकावर खत देखील भिजले. त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यावर दुहेरी संकट आल्याचे दिसून आले. तर रात्री झालेल्या विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्याने अनेक गावातील विद्युत खांब मोडून पडले. रात्रीपासून दुरुस्तीचे काम सुरू आहे. परिणामी सर्वच नगर पालिका अन नगर पंचायत चा पाणी पुरवठा बंद झाल्याने शहरी भागातही ग्रामीण भागासारखी परिस्थिती येऊन ठेपली होती. हिंगोली कर देखील हातात भांडे घेऊन पाण्याच्या शोधात भटकंती करताना दिसून आले. तर विद्युत वितरण अन नागरपालिकातर्फे दुरुस्ती असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आज हिंगोली कराना पाणी आणि विजेचे महत्व कळले असले तरी पावसाळ्याच्या तोंडावरच पाणी अन विद्युत पुरवठ्याचा फजा झाल्याचे दिसून आले.

हळद भिजल्याचे fid ftp केले आहे, कृपया ते बातमीत वापरून घ्यावेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.