ETV Bharat / state

पोलिसांनी ठोकल्या पाच चोरट्यांना बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त

हिंगोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पाच अट्टल चोरट्यांना अटक करत त्यांच्याकडून तब्बल 4 लाख 74 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जप्त मुद्देमाल
जप्त मुद्देमाल
author img

By

Published : Jan 23, 2021, 4:32 PM IST

हिंगोली- पाच सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून 4 लाख 74 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अजूनही अनेक चोऱ्या उघड होण्याची दाट शक्यता आहे.

विलास रमेश शिंदे, राजू उर्फ अन्या महादेव भोसले, गिड्या उर्फ गिड्या गंगप्पा भोसले, राजू उर्फ बिरांडा गंगप्पा भोसले व आकाश बालाजी डोईजड, ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नावे आहेत.

आरोपीने दिली चोरी केल्याची कबुली

ताब्यात घेतलेल्या आरोपीने हट्टा, वसमत, आखाडा बाळापूर व कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या वेळी घराच्या कडीकोयंडा तोडून घरांमध्ये शिरून तेथील सोने-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेल्याचे सांगितले. त्यावरुन चार घरफोड्यातील गेलेल्या मालापैकी 4 लाख 24 हजार 600 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच 50 हजार रुपये किमतिची दुचाकी असा एकूण 4 लाख 74 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अजूनही त्यांची कसून चौकशी केली जात असून त्यांच्याकडून अजून काही चोऱ्या उघडकीस होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.