ETV Bharat / state

जामठी खुर्द परिसरात हरणाची शिकार; आरोपी अद्याप फरारच - jamthi khurd Hingoli

तालुक्यातील जामठी खुर्द परिसरात हरिणाची शिकार झाली होती. या प्रकरणी वन विभागला अद्याप आरोपी न गवसल्याने वन्यप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर त्यांच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

हरणाची शिकार
author img

By

Published : Sep 14, 2019, 11:01 AM IST

हिंगोली- तालुक्यातील जामठी खुर्द परिसरात हरणाची शिकार करून त्याच्या मासाचे तुकडे केले जात होते. ही बाब वनविभागाच्या लक्षात येताच विभागातील चपळ वनरक्षकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत शिकऱ्याने अर्धवट मास घेऊन पोबारा केला होता. त्यानंतर सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर वनविभागाने गुन्हा दाखल केला. मात्र ही घटना घडून आता सहा दिवस उलटले. तरीही वनविभागाला आरोपी गवसले नसल्याचे चित्र आहे.

hingoli
शिकार झालेल्या हरणाचे मांस

हिंगोली जिल्ह्यात दिवसेंदिवस वन्यप्राण्यांच्या शिकारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दोन महिन्यापूर्वी देखील औंढा नागनाथ तालुक्यात अशीच एका वन्यप्राण्याची शिकार करण्यात आली होती. त्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच वनविभागने आरोपींना शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तत्परता दाखवली होती. मात्र या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी तर विलंब लावलाच. मात्र सहा दिवस उलटले तरी अद्याप वनविभागाला फरार आरोपींचा सुगावा लागला नाही.

इतकेच नव्हे तर नेहमीच वन्य प्राण्यांमध्ये वावरणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटना स्थळावरील शव नेमके कोणत्या प्राण्याचे आहे हे देखील कळू शकले नाही. प्रयोग शाळेकडून अहवाल आल्यानंतर कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या. यात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र आता फरार आरोपी नेमका कधी सापडणार, आणि असेच सुरू राहिले तर खरोखरच शिकाऱ्यावर वनविभागाचा वचक राहील का? असा प्रश्न वन्यप्रेमींकडून उपस्थित केल्या जात आहे. त्याचबरोबर या प्रकरणी वनविभागाच्या कर्तव्याबद्दल देखील शंका व्यक्त केली जाते.

हेही वाचा- हिंगोलीत दुसऱ्यांदा जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; साडे सात लाखांचा मुद्देमाल जप्त

दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात १०० च्या वर कुत्रे मारल्या प्रकरणी पाच आरोपी ताब्यात घेण्यात आले. मात्र जिल्हा वन विभागाला हरणाची शिकार करणाऱ्याला देखील पकडता आले नाही. वनविभागाचा असाच आलबेल कारभार सुरू राहिला तर शिकाऱ्यांमध्ये भीती निर्माण होण्याऐवजी त्यांचे मनोबल वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Intro:

हिंगोली- तालुक्यातील जामठी खुर्द परिसरात हरिणाची शिकार करून त्याच्या मासांचे वर्गीकरण केले जात होते. ही बाब वनविभागाच्या चपळ वनरक्षकास कळताच घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत शिकऱ्याने अर्धवट मांस घेऊन पोबारा केला. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर वनविभागाने गुन्हा दाखल केला मात्र फरार आरोपी विरुद्ध. घटना घडून सहा दिवस उलटले तरीही आरोपी फरारच आहेत.

Body:हिंगोली जिल्ह्यात दिवसेंदिवस वन्यप्राण्यांच्या शिकारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे दोन महिन्यापूर्वी देखील औंढा नागनाथ तालुक्यात अशीच एका वन्यप्राण्यांची शिकार केली होती त्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच वनविभाग आणि शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तत्परता दाखवली होती. मात्र या हरीण प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी तर विलंब लावलाच लावला मात्र गुन्हा दाखल केला तोही फरार आरोपीवर. सहा दिवस उलटूनही अद्याप वनविभाग त्या फरार आरोपीचा शोध लावू शकला नाही. वरून नेहमीच वन्य प्राण्यांमध्ये वावरणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना साधे नेमके कोणते प्राण्याचे आहे. हे देखील कळू शकले नाही. ही खेदाची बाब आहे. प्रयोग शाळेकडून
अहवाल आल्यानंतर कारवाई च्या हालचाली सुरू झाल्या. यात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा तर दाखल झाला. मात्र आता ते फरार आरोपी नेमके कधी सापडणार, अन असेच सुरू राहिले तर खरोखरच शिकऱ्यावर वनविभागाचा वचक राहील का? असा प्रश्न वन्यप्रेमीतून निघत आहे. आता ते फरार आरोपी शोधण्यासाठी अजून किती दिवसाचा कालावधी लावणार? या सर्व प्रकाराबद्दल वनविभागाच्या कर्तव्याबद्दल शंका व्यक्त केली जाते. दुसरीकडे मात्र बुलढाणा जिल्ह्यात 100 च्या वर कुत्रे मारल्या प्रकरणी पाच आरोपी ताब्यात घेतलेत अन हिंगोलीचा वन विभाग मात्र हरणाची शिकार करणाऱ्या शिकऱ्याला ही पडू शकले नाहीत. सहा दिवसात ही यांना एकही शिकारी सापडू शकला नाही. अटक होण्यासाठी स्वतःहून शिकारी येतील याची तर हिंगोलीचा वनविभाग प्रतीक्षा करीत नसेल ना? वनविभागाचा असाच आलबेल कारभार सुरू राहीला तर शिकाऱ्यामध्ये भीती निर्माण होण्याऐवजी त्यांचे तर मनोबल वाढण्याची शक्यता आहे. Conclusion:वनविभाग हरणाच्या शिकारीची बाब एवढी सहज पद्धतीने का हाताळत आहे. आशा एक ना अनेक शंका उपस्थिती होत आहेत. मात्र फरार झालेले शिकारी वनविभागाचे अपेक्षेपेक्षा ही जास्त आभार मानत असावेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.