हिंगोली- वसमत येथील सहकार क्षेत्रातील अग्रणी व महाराष्ट्राचे माजी सहकार व वस्त्रोद्योग मंत्री जयप्रकाश रावसाहेब साळुंके (दांडेगावकर) यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या या निवडीमुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. महासंघाच्या संचालक मंडळाच्या 214 व्या शिखर बैठकीत एकमताने ही निवड करण्यात आली.
दिलीप वळसे पाटील या आगोदरचे अध्यक्ष
दांडेगावकर यांच्यापूर्वी दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष होते. परंतु त्यांचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून समावेश झाल्याने त्यांनी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ते सहकारी साखर कारखाना क्षेत्राशी दीर्घ काळापासून संबांधित आहेत. सध्या ते महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना फेडेरेशन , मुंबईचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
दांडेगावकरांचे साखर कारखाना क्षेत्रात मोठे योगदान
दांडेगावकर हे हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे वरिष्ठ संचालक म्हणून काम करताना त्यांनी साखर कारखाना क्षेत्रात सुधार ( रिफॊर्म ) होण्याचा जोरदार पाठपुरावा केला आहे . सहकार व साखर क्षेत्रातील त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व संचालक मंडळानी दाखविलेल्या, विश्वासाबद्दल दांडेगावकर यांनी संचालक मंडळाचे आभार मानले.
सहकारी साखर कारखान्यांच्या गुणवत्ता वाढीवर भर-
हा दिला दांडेगावकर यांनी विश्वास*या क्षेत्राशी संबधीत प्रश्न ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांच्या समस्या, रास्त दर, उसाची थकबाकी, उसाला देण्यात येणारी किमान आधारभूत किंमत, कारखान्यांना मिळणारा वित्तीय पुरवठा,त्यातील व्यावहारिक अडचणी तसेच साखरेची निर्यात याबाबतच्या प्रश्नांचा केंद्र व राज्य शासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा करू. तसेच सहकारी साखर कारखान्यांची गुणवत्ता वाढावी त्यांचा आर्थिक व वाणिज्यविषयक कारभार अधिक चोख व्हावा यासाठी आपण संचालक मंडळाच्या साह्याने प्रयत्न करणार असल्याचा विश्वास दांडेगावकर यांनी व्यक्त केला.
हेही वाचा- नरभक्षक बिबट्याचा खात्मा करणारे डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांचे अकलूजमध्ये जंगी स्वागत