ETV Bharat / state

Suicide in Hingoli : हिंगोली जिल्हा हादरला; अवघ्या चार दिवसात चार जणांनी संपविले जीवन - 4 person commit suicide in Hingoli

हिंगोली जिल्ह्यात आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. दोन तरुणानंतर आज एका दाम्पत्याने गळफास घेत ( 4 Suicide in Hingoli ) आत्महत्या केली. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

हिंगोली
Suicide in Hingoli
author img

By

Published : Jan 3, 2022, 11:43 AM IST

हिंगोली - जिल्ह्यामध्ये तीन ते चार दिवसांपासून आत्महत्येचे सत्र हे सुरूच आहे. यापूर्वी दोन तरुणांनी तर आज पती-पत्नीने एकाच झाडाला गळफास घेत आत्महत्या ( 4 Suicide in Hingoli ) केली. आशा एकूण चार जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने जिल्हा चांगलाच हादरून गेला आहे. मयत पती-पत्नी हे सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील रहिवासी असून दाताडा शिवारात त्यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेत जीवन यात्रा संपविली आहे. आत्महत्येचे कारण अजून तरी अस्पष्ट आहे. मात्र, सलग चार दिवसात चार जणांनी आत्महत्या केल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली.

रामदास बाळू इंगळे (24), शीतल रामदास इंगळे(22) अशी मयत पती-पत्नीची नावे आहेत. या दोघांचा तीन वर्षापूर्वी विवाह झाला होता. तर इंगळे यांनी मागील तीन वर्षांपूर्वी सेनगाव तालुक्यातील दाताडा शिवारात शेत घेतले होते. त्यामुळे ते आपल्या कुटुंबासह शेतातच आखड्यावर राहत असत तर रामदास यांचा मडी गावातील शीतल यांच्यासोबत तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तीन महिन्यापूर्वी माहेरी गेल्या होत्या. त्यांना आणण्यासाठी रामदास सासरी गेला होता. तो परत आल्याची माहिती कळली होती. मात्र, आखाड्यावर हे दोघेही परत येत असल्याने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तर त्यांच्या दोघांचेही मृतदेह एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, उपनिरीक्षक अच्युत भोपळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दोन युवकांची आत्महत्या -

हिंगोली जिल्ह्यांमध्ये आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. अशातच हिंगोली शहरातील दोन युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामध्ये अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी रितेश आठवले आणि वंजारवाडा येथील आकाश कुटे या भागातील दोन युवकांनी देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यानंतर दाम्पत्याने आत्महत्या केल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - Housing Sale Increased : 7 मोठ्या शहरात घरांची विक्री 71 टक्यांनी वाढली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.