ETV Bharat / state

हिंगोलीत पोलीस अधीक्षकांसमोर अवैध दारू विक्रेत्यांची धुलाई - Liquor seller punished Hingoli

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दारू विक्रेत्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात नेले व स्वतः पोलीस अधीक्षक यांच्या समोर त्यांची धुलाई केली. मारतानाचा आवाज सर्व कार्यालय परिसरात घुमत असल्याने बाहेर थांबलेल्या दारू विक्रेत्यांचा थरकाप सुटल्याचे धक्कादायक चित्र पाहावयास मिळाले.

Office of the Superintendent of Police Hingoli
पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली
author img

By

Published : Nov 11, 2020, 2:47 AM IST

हिंगोली- जिल्ह्यातील विविध भागात गाव तिथे अवैध दारू, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असल्याने, दिवसेंदिवस व्यसनाधीनतेत वाढ होत चालली आहे. शिवाय गावांची शांतता देखील भंग होत चालली असल्याने आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यातील ६१ अवैध दारू विक्रत्यांना ताब्यात घेऊन त्यांची धुलाई केली.

पथकाने विक्रेत्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात नेले व स्वतः पोलीस अधीक्षक यांच्या समोर त्यांची धुलाई केली. मारतानाचा आवाज सर्व कार्यालय परिसरात घुमत असल्याने बाहेर थांबलेल्या दारू विक्रेत्यांचा थरकाप सुटल्याचे धक्कादायक चित्र पाहावयास मिळाले.

जिल्ह्यात सध्या अवैध दारू विक्री व अवैध धंद्यांचा प्रचंड उत आलेला आहे. यात अती गंभीर प्रकार म्हणजे गाव तिथे दारू, असा दारूचा महाप्रताप सुरू आहे. त्यामुळे, व्यसनाधीनतेच्या संख्येत वाढ होत चालली असून, याचा विपरीत परिणाम हा शालेय विद्यार्थ्यांवर होत आहे. तसेच, ज्या गावात अवैध दारू विक्री सुरू आहे, त्या गावात रात्रीच्या वेळी शांततेचा भंग देखील होऊ लागला आहे. हे सर्व नवीन पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या कारकिर्दीत सुरू असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात होते. त्यामुळेच, आज स्थानिक पोलीस शाखेच्या पथकाने जिल्ह्यातील सर्वच अवैध दारू विक्रेत्याना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले. तेथे पोलीस अधीक्षक कलासागर यांनी, दारू व्यवसाय बंद करून दुसरा व्यवसाय सुरू करण्याची विक्रेत्यांना सूचना केली. तसेच, अवैध दारू विक्री केली म्हणून विक्रेत्यांना शिक्षा केली.

पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात घुमत होता आवाज

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या अवैध दारू विक्रेत्यांच्या नावाची नोंद करून, या सर्वांना एकत्र ठेवले होते. आणि एक एक करून त्यांना पोलीस अधीक्षक कलासागर यांच्या समोर हजर केले. त्यामुळे, जणू काही एखाद्या मुलाखतीलाच हे सर्व जण आलेत असाच काहीसा भास होत होता. मात्र, कार्यालयातून बाहेर येताना अवैध दारू विक्रेता हात चोळत येत असल्याचे पाहून सर्वांच्या अंगाचे पाणी पाणी झाले.

अवैध दारू विक्रेत्यांना वेगवेगळ्या खोलीत ठेवण्यात आले

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या सर्वच दारू विक्रत्यांना एका खोलीत ठेवण्यात आले होते. तर, पोलीस अधीक्षक यांच्या समोर हजेरी लावलेल्या आणि बदडून काढलेल्या अवैध दारू विक्रेत्यांना एका खोलीत ठेवण्यात आले होते. त्यामुळे, मार खाऊन आलेले एकमेकांना हात दाखवत होते. विक्रेत्यांना एवढे झोडून काढले की, परिसरात मोठ मोठ्याने मारण्याचा आवाज घुमत होता.

सुधरण्याची दिली संधी

पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी ताब्यात घेतलेल्या सर्वच दारू विक्रेत्यांची चांगलीच मुलाखत घेऊन त्यांना सुधरण्याची संधी दिली. एवढे करून जर काही बद्दल होणार नसेल तर थेट गुन्हे दाखल करण्याची तंबी दिली. त्यामुळे, आता दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. आता खरोखरच पोलीस अधीक्षक यांच्या सूचनांचा आणि धुलाईचा काही परिणाम झाला की नाही, हे येत्या काळात दिसून येणार आहे.

चौकशीसाठी बोलवण्यात आले होते

जिल्ह्यातील सर्वच अवैध दारू विक्रेत्यांना मोठ्या प्रेमाने बोलावले होते. यापूर्वीही चोरट्यांचा असाच समाचार घेण्यात आला होता. तीच पद्धत या अवैध दारू विक्रेत्यांसाठी वापरण्यात आली होती. अजूनही अवैध दारू विक्रेत्यांचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घेत आहे. मात्र, अवैध दारू विक्री करणाऱ्यांची धुलाई केल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने ग्रामीण भागात दारू न पिणाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हाभरातील अवैध दारू विक्रेते पकडून आणल्यानंतर त्यांचे फोटो न काढू देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील पथक, तसेच बाहेर तैनात असलेले पोलीस कर्मचारी फार खबरदारी पाळत होते.

हेही वाचा- हिंगोलीमध्ये ट्रॅक्टर विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.