ETV Bharat / state

हिंगोली : 'त्या'घरात सापडला अवैध गुटखा

author img

By

Published : Sep 5, 2020, 8:54 PM IST

दोन दिवसांपूर्वी आनंद नगर भागात असलेल्या एका घरात सुरू असलेल्या बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा टाकत एकाला ताब्यात घेतले होते. त्याचघरातून पोलिसांनी गुटख्याचा मोठा जप्त केला आहे.

police
जप्त केलेल्या गुटख्यासह पोलीस पथक

हिंगोली - शहरातील आनंद नगर भागात असलेल्या एका घरात केवळ नोटांचा नाही तर अवैध गुटख्याचाही व्यवसाय चालतअसल्याची माहिती दहशतवादी विरोधी पथकाच्या छाप्यातून उघडकीस आली आहे. यामुळे बनावट नोटांपाठोपाठ आता गुटख्याबाबतही ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, हिंगोली शहरातील आनंद नगर भागात एका घरांमध्ये सुरू असलेल्याबनावट नोटांच्या कारखान्याचा दहशतवाद विरोधी पथकाने दोन दिवसांपूर्वी भांडाफोड केला होता. त्या ठिकाणी काही प्रमाणात पानमसाला देखील आढळून आला होता. सर्व मुद्देमाल ताब्यात घेऊन पथकाने मुख्य आरोपी असलेल्या संतोष देशमुख यांची कसून चौकशी केली असता तो सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र, पोलिसी खाक्या दाखवतात तो पोपटासारखा बोलू लागला. पण, या ठिकाणी केवळ बनावट नोटा नव्हे तर अवैध गुटख्याचाही व्यवसाय सुरू असल्याचे त्याने सांगितले. यातूनच गुटखा व्यवसायामध्ये बनावट नोटांचा वापर केला जात असल्याचेही तो सांगत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तो आनंद नगर येथील घरात भाड्याने राहत होता. त्याने घराच्या पाण्याच्या टाकीमागे अवैध गुटखा लपवून ठेवण्याची माहिती दिली त्यानुसार उप-अधीक्षक रामेश्वर वैंजने, जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, महेश बंडे, अर्जून पडघन, रुपेश धाबे, विजय घुगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता गच्चीवर पाण्याच्या टाकी मागे पिवळ्या पिशवीत लपून ठेवलेल्या गुटख्याच्या पांढऱ्या 12 बोऱ्यामध्ये 44 हजार पाचशे 38 रुपये किंमतीचा अवैद्य गुटखा सुगंधित तंबाखू मिळून आला. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात संतोष देशमुख यांच्या विरोधात भा.दं.वि.चे कलम 328, 273, 274 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - हिंगोली : बनावट नोटांच्या कारखान्याचा पर्दाफाश; 17 लाखांच्या नोटा जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.