हिंगोली - कोरोनाच्या काळात दहावी बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. मात्र, विद्यार्थ्यांना आता जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. येत्या आठवडाभरात बारावीचा तर 31 जुलैपर्यंत दहावीचा निकाल लागणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हात दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी निकालाबाबत माहिती दिली. कोरोनाचे संकट असताना दहावी, बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थांचे लक्ष होते. मात्र, हे निकाल याच महिन्यात लागणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेचा त्यांनी आढावा घेतला. शहरातील औंढा ते हिंगोली रस्त्यावरील रुग्णालयाचे उद्घाटनही त्यांनी केले.
हेही वाचा- राज्यातील पुरुष रुग्ण ठरत आहेत कोरोनाचे सर्वाधिक बळी...