ETV Bharat / state

क्रीडा संकुलनातील जलतरण तलाव दुरुस्तीचे भिजते घोंगडे दरवर्षी कायम

उद्घाटन झालेल्या वर्षी जेमतेम मोजकेच दिवस जलतरण तलावामध्ये पाणी होते. यावेळी स्पर्धाही झाल्या. स्पर्धेदरम्यान एका जलतरणपटूला फरशी निखळल्याने हाताला गंभीर जखम झाली होती. मात्र, त्याच्या काही दिवसानंतरच अचानक जलतरण तलाव बंद पडला.

हिंगोली जलतरण तलाव १
author img

By

Published : Jul 7, 2019, 3:36 PM IST

हिंगोली - शहरापासून काही अंतरावर असलेले आणि क्रीडा विभाग अधिकाऱ्यांच्या जवळ असलेला लिंबाळा मक्ता भागातील जलतरण तलाव दुरुस्तीचे दरवर्षी भिजत घोंगडे कायम आहे. सन २००६ मध्ये उद्घाटन झालेल्या जलतरणात मोजकेच दिवस पाणी खेळले. या काळात येथे जिल्हास्तरीय स्पर्धाही झाल्या. मात्र, का कुणास ठाऊक कोणत्या कारणाने हा जलतरण तलाव बंद पडला आणि दुरुस्ती करण्यासाठी आजतागायत केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत. उन्हाळा गेला आणि आता पावसाळ्याच्या तोंडावर दुरुस्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

हिंगोली जलतरण तलाव

जिल्ह्यातील लिंबाळा मक्ता परिसरात क्रीडा व युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा संकुलन समितीच्या वतीने २७ मे २००६ रोजी तत्कालीन राज्य व पालकमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते जलतरण तलावाचे उद्घाटन झाले होते. उद्घाटन झालेल्या वर्षी जेमतेम मोजकेच दिवस जलतरण तलावामध्ये पाणी होते. यावेळी स्पर्धाही झाल्या. स्पर्धेदरम्यान एका जलतरणपटूला फरशी निखळल्याने हाताला गंभीर जखम झाली होती. मात्र, त्याच्या काही दिवसानंतरच अचानक जलतरण तलाव बंद पडला. तेंव्हापासून जलतरण तलाव दुरुस्त झाला नाही.

वास्तविक पाहता आतापर्यंत दुरुस्तीच्या नावावर शासनाचे लाखो रुपये खर्च झाले आहेत. तरीदेखील अद्याप साधी दुरुस्ती देखील झालेली नाही. विशेष म्हणजे जिल्हा क्रीडा कार्यालय हे शहरापासून कोसो दूर अंतरावर असल्यामुळे या ठिकाणी काय घडामोडी घडतात याचा जराही थांगपत्ता लागत नाही. या विभागाच्यावतीने अनेक महत्वकांक्षी योजना राबविल्या जातात. त्या पूर्ण झाल्याचे अहवाल या विभागाकडे प्राप्त होतात. मात्र, जवळच असलेल्या जलतरण तलवाच्या अवस्थेवरून हा विभाग किती सतर्क असेल हे वेगळ्या शब्दात सांगायची अजिबात गरज नाही. एवढेच नव्हे तर जलतरण तलावाच्या दुरुस्तीसंदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास ते अगोदर मनमुराद हसून घेतात. यानंतर या प्रवास सांगायला सुरुवात करतात. दुरुस्तीऐवजी नवीन जलतरण तलाव बांधलेला परवडेल, असेही अधिकारी सांगतात.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या मुख्य कमानीवर असलेली जिल्हा क्रीडा संकुलन नावातील अनेक अक्षरे गळून पडत आहेत. ही स्थिती जवळपास १ ते २ वर्षांपासून आहे. त्याची देखील साधी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. तेव्हा जलतरनिकेच्या दुरुस्तीचा कधी मुहूर्त लागेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विभागाकडे दुरुस्तीची विचारणा होते त्यावेळी फाईल त्या विभागकडे गेलीय, याची मंजूरी राहिली आहे, ते अपूर्ण राहिलीय, अशी कारणे देत नेहमीच दुसऱ्या विभागाकडे बोट दाखवले जाते. तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी देखील जलतरण तलावाची पाहणी केली होती. त्यावेळी दुरुस्तीची हालचाली चालू झाल्या होत्या परंतु, इतक्यात त्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर आजपर्यंत दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू आहे.

Intro:हिंगोली शहरापासून काही अंतरावर अन क्रीडा विभाग अधिकाऱ्यांच्या उषा पायथ्याशी असलेल्या लिंबाळा मक्ता भागातील जलतरणीकेच्या दुरुस्तीचे दर वर्षी भिजत घोंगडे कायम आहे. २००६ मध्ये उद्घाटन झालेल्या जलतरनिकेत जेम तेम मोजकेच दिवस पाणी खेळले. तेव्हड्यात काळात येथे जिल्हास्तरीय स्पर्धा ही झाल्या. मात्र का कुणास ठाऊक कोणत्या कारणाने ही जलतरणीका बंद पडली तिची दुरुस्ती करण्यासाठी आजतागायत केवळ अन केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत. सारा उन्हाळा गेला अन आता पावसाळ्याच्या तोंडावर या यंदा जलतरनिका दुरुस्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Body:जिल्ह्यातील लिंबाळा मक्ता परिसरात क्रिडा व युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा संकुलन समिती च्या वतीने २७ मे २००६ रोजी तत्कालीन राज्य व पालमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. उद्घाटन झालेल्या त्याच वर्षी जेमतेम मोजकेच दिवस या जलतरण इके मध्ये पाणी खेळले, स्पर्धाही झाल्या स्पर्धा दरम्यान एका जलतरणपटू ला फरशी निखळल्याने हाताला गंभीर जखम झाली होती. मात्र त्याच्या काही दिवसानंतरच अचानक ही जलतरण एका बंद पडली. अन तेव्हापासून सुरू झालाय या जलतरनिकेच्या दुरुस्तीचा प्रवास तो अजून संपायच नावच घेत नाही. वास्तविक पाहता आतापर्यंत दुरुस्तीच्या नावावर शासनाचे लाखो रुपये खर्च झाले आहेत. तरीदेखील अद्याप या जलतरनीकेची साधी दुरुस्ती देखील झालेली नाही. विशेष म्हणजे जिल्हा क्रीडा कार्यालय हे शहरापासून कोसो दूर अंतरावर असल्याने, या ठिकाणी काय सावळा गोंधळ चाललाय याचा जराही थांगपत्ता लागत नाही. या विभागाच्यावतीने अनेक महत्वकांक्षी योजना राबविल्या जातात. त्या पूर्ण झाल्याचे अहवाल या विभागाकडे प्राप्त होतात. मात्र उषा पायथ्याशी असलेल्या जलतरनीकेच्या अवस्थेवरून हा विभाग किती सतर्क असेल हे वेगळ्या शब्दात सांगायची अजिबात गरज नाही. एवढेच नव्हे तर जलतरनिकेच्या दुरुस्तीसंदर्भात कारत अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास ते अगोदर मनमुराद हसून घेतात. अन नंतर या जलतरनिकेचा प्रवास संगसायला सुरुवात करतात. वरून म्हणतात ही की जलतरनिका दुरुस्ती पेक्षा नवीन जलतरनिकेचे काम सुरू केले तर परवडते. म्हणजे या अधिकाऱ्यांना नेमके म्हणायचे तरी काय हेच कळायला मार्ग नाही.

Conclusion:जलतरनिकेची तर बकाल अवस्था झालीच मात्र जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या मुख कमानीवर असलेल्यास जिल्हा क्रीडा संकुलन नावातील अनेक अक्षरे गळून पडत आहेत. ही स्थिती जवळपास एक ते दोन वर्षांपासून आहे. त्याची देखील साधी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. तेव्हा जलतरनिकेच्या दुरुस्तीचा कधी मुहूर्त लागेल? जलतरनिकेच्या दुरुस्तीचा प्रश्न एवढा आंबट होऊन गेलाय की तो अधिकार्यासमोर बोलता बोलता आला तर अधिकारी नाक मुरडायला लागतात. जेव्हा तेव्हा या विभागाकडे दुरुस्तीची विचारणा होते तेव्हा तेव्हा , फाईल त्या विभागकडे गेलीय, तही मंजूरी राहिलीय, ते अपूर्ण राहिलीय, असे नेहमीच दुसऱ्या विभागाकडे बोटे दाखविले जातात. या सर्व परिस्थिती वरून हा विभाग जलतरनिकेच्या दुरुस्तीसाठी किती धडपड करतोय हेच दिसून येतंय. तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी देखील या जलतरनिकेची पाहणी केली होती. तेव्हा कुठे काही प्रमाणात गती अली अन त्यांची बदली झाली. तेव्हापासून अजूनही कामाची कासव गतीच आहे. आता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी लक्ष घातले तर दुरुस्ती होऊन यंदा नव्हे पुढील वर्षीच्या उन्हाळ्यात तरी ही जलतरनिका उपयोगात येईल अशी अपेक्षा जलतरणपटू आणि युवकातुन होत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.