हिंगोली - जिल्ह्यातील नर्सी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचार्याचा भंडारा जिल्ह्यात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. कुश श्रीराम बडगे, असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते मुळचे भंडारा जिल्ह्यातील यागावचे रहिवासी होते.
हेही वाचा - 'चंद्रकांत पाटलांना माझ्यावर पीएचडी करायला 12 वर्षे लागतील'
भंडारामध्ये सासुरवाडीला भेट देण्यासाठी आले असता त्यांच्यासोबत ही दूर्घटना घडली. बडगे यांच्या मृत्यूबाबत भंडारा पोलिसांनी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांना कळविले होते. त्यांच्या सूचनेनुसार नर्सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर पथकासह भंडाराकडे रवाना झाले आहेत.
हेही वाचा - VIDEO : पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली सहा मजली इमारत..