ETV Bharat / state

पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या चोराला दुसर्‍याच दिवशी अटक; बाळापूर पोलिसांची कारवाई

अट्टल दुचाकी चोर... पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला पण पोलिसांनी सर्व जिल्ह्यात नाकाबंदी करून दुसऱ्याच दिवशी त्याला बेड्या घातल्या.

आखाडा बालापूर पोलिसांनी चोरट्याला अटक केली
author img

By

Published : Aug 19, 2019, 1:36 PM IST

हिंगोली - एक अट्टल दुचाकी चोर आखाडा बाळापूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन रविवारी रात्री पळून गेला होता. यानंतर पोलिसांनी जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी केली होती. रात्रभराच्या तपासणीनंतर हा चोरटा सकाळी अकराच्या सुमारास पोलिसांच्या हाती आला आहे.

जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. वाढत असलेल्या घटना पाहून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरास ताब्यात घेण्यासाठी पथके स्थापन केली होती. पथके जिल्ह्यात जागोजागी चोरट्यावर लक्ष ठेऊन होते. गोपनीय माहितीच्या आधारे मिळालेल्या माहिती नुसार वसमत येथे दुचाकी विक्रीसाठी आलेल्या देगलूर येथील देविदास बाबुराव कांबळे याला पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले अन त्याने नांदेड शहरातील अनेक दुचाकी चोरून हिंगोली जिल्ह्यात विक्री केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी तब्बल 26 दुचाकी जप्त केल्या होत्या. याप्रकरणी दुचाकी चोरावर आखाडा बाळापूर येथे गुन्हा दाखल केला आणि चोरट्याला आखाडा बाळापूर पोलिसांच्या हवाली केले होते.

आखाडा बाळापूर पोलिसांनी रविवारी चोरट्याला सेनगावच्या न्यायालयात हजर केले होते. त्याला रात्री परत आखाडा बाळापूर येथे नेत असताना कळमनुरी जवळ माळेगाव फाटा येथे वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस वाहन थांबल्याने तसेच वाहनात केवळ दोनच कर्मचारी असल्याची संधी पाहून चोरट्याने पोलीस वाहनातून उडी मारून पलायन केले होते.

akhada balapur police  arrested thief
पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या चोरला दुसर्‍याच दिवशी अटक; बाळापूर पोलिसांची कारवाई

पोलिस वाहनात असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी त्याचा बराच लांब पाठलाग केला. मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नाही. सोयाबीनचे पीक जास्त वाढल्याने अंधार पडल्यामुळे पोलिसांना तो रात्रीच्या सुमारास सापडला नाही पोलिसांनी रात्री बराच वेळ शोध घेतला, नाकाबंदी देखील केली. चोर ज्या दिशेने पळून गेला, त्या दिशेने पथकाने तपासणी केली तर तो एका झाडाखाली झोपलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. जरी हा चोरटा सापडला असला तरी पोलिसांच्या हलगर्जीपणाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

Intro:
हिंगोली- चक्क 26 26 दुचाकी स्थानिक गुन्हे शाखेला पकडून देणारा अट्टल दुचाकी चोरटा आखाडा बाळापुर पोलिसांच्या हातावर तुरी देत रविवारी रात्री पळून गेला होता. त्यामुळे पोलिसांनी जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी केली रात्रभराच्या तपासणीनंतर चोरटा पहाटे अकराच्या सुमारास आढळून आला. चोरटा सापडला असल्याचे मोठ्या आनंदाने पोेनि गणपत राहिरे यांनी सांगितले

Body:जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना मोठया प्रमाणात वाढल्या आहेत. वाढत असलेल्या घटना पाहून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरास ताब्यात घेण्यासाठी पथके स्थापन केली होती. पथके जिल्ह्यात जागोजागी चोरट्यावर लक्ष ठेऊन होते. गोपनीय माहितीच्या आधारे मिळालेल्या माहिती नुसार वसमत येथे दुचाकी विक्रीसाठी आलेल्या देगलुर येथील देविदास बाबुराव कांबळे याला पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले अन त्याने नांदेड शहरातील अनेक दुचाकी चोरून हिंगोली जिल्ह्यात विक्री केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी तब्बल 26 दुचाकी जप्त केल्या होत्या. याप्रकरणी दुचाकी चोरावर आखाडा बाळापूर येथे गुन्हा दाखल केला अन चोरट्याला आखाडा बाळापुर पोलिसांच्या हवाली केले होते. आखाडा बाळापुर पोलिसांनी रविवारी चोरट्याला सेनगावच्या न्यायालयात हजर केले होते. त्याला रात्री परत आखाडा बाळापूर येथे नेत असताना कळमनुरी जवळ माळेगाव फाटा येथे वाहतूक ठप्प झाली होती. पोलिस वाहन थांबल्याने तसेच वाहनात केवळ दोनच कर्मचारी असल्याची संधी पाहून चोरट्याने पोलिस वाहनातून उडी मारून पलायन केले होते.
पोलिस वाहनात असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी त्याचा बराच लांब पाठलाग केला. मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नाही. सोयाबीनचे पीक जास्त वाढल्याने अंधार पडल्यामुळे पोलिसांना तो रात्रीच्या सुमारास सापडला नाही पोलिसांनी रात्री बराच वेळ शोध घेतला नाकाबंदी ही केली मात्र सापडला नाही. आज कुठे चोरटे पळून गेल्याच्या दिशेने पथकाने तपासणी केली तर चोर एका झाडाखाली झोपलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. जरी चोरटा दुसऱ्या दिवशी सापडला असला तरीही तावडीतून पळून गेलेल्या चोरट्या मुळे पोलिसांचा यामध्ये मात्र हलगर्जीपणा दिसून आला. चोरट्याने पलान केल्यामुळे आखाडाबाळापुर पोलीस चांगलेच भांबावून गेले होते. मात्र चोरटा सापडल्यानंतर कुठे बाळापुर पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला.Conclusion:पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्याची चर्चा जिल्ह्यात जोरात रंगली होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.