ETV Bharat / state

मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत हिंगोलीत राष्ट्रवादीत मोठी फूट पडण्याची शक्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 21 ऑगस्टपासून सुरू झाला आहे. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यात ही यात्रा येणार आहे. या पार्श्वभूमीवर या प्रदेशातील राजकीय हालचालींना चांगलीच गती आलेली दिसत आहे.

मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत हिंगोलीत राष्ट्रवादीत मोठी फूट पडण्याची शक्यता
author img

By

Published : Aug 23, 2019, 12:36 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात 30 ऑगस्टला मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा दाखल होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. अनेक लहानमोठे कार्यकर्तेही मुख्यमंत्र्याच्या हस्ते गळ्यात माळ टाकून घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडण्याची शक्यता आहे.

mahajanadesh yatra
मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत हिंगोलीत राष्ट्रवादीत मोठी फूट पडण्याची शक्यता

हिंगोली जिल्ह्यात महिनाभरापासून दबक्या आवाजात अनेकांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होत असली तरी मागील तीन ते चार दिवसापासून उघडपणे चर्चा होत आहेत. काही बड्या नेत्यांची नावानिशी चर्चा होताना दिसत आहे. यात राष्ट्रवादीच्या नेत्यांची सर्वाधिक चर्चा होताना दिसते.

हिंगोली नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे ७ नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले असले तरी अजून दोन नगरसेवकांसाठी भाजपची ओढाताण सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजत आहे. आता मुख्यमंत्र्यांच्याच उपस्थीत होणारा हा बार खरा ठरणार की केवळ चर्चेचा फुसका बार ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

mahajanadesh yatra
30 ऑगस्टला मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा हिंगोलीत दाखल होणार

भाजपचा "पाच वर्षपूर्ती मेळावा" सेनगाव येथे आयोजित

पाच वर्षात मतदारसंघात भाजपच्यावतीने करण्यात आलेल्या कामाचा लेखाजोखा या मेळाव्यात मांडला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री अतुल सावे, राज्य कृषी मूल्य आयोग अध्यक्ष पाशा पटेल, प्रदेश प्रवक्ता गणेश हाके, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, संघटन मंत्री भाऊराव देशमुख आदी नेते उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात देखील अनेकजण भाजप प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

Intro:मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा हा 21 ऑगस्ट पासून सूरु झालाय. संपूर्ण महाराष्ट्रात जाणाऱ्या या यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यातुन ही यात्रा जाणार असून, राजकीय हालचालींना चांगलीच गती आलीय. हिंगोलीत तर एवढी तयारी सुरू आहे की, मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत लहान सहान कार्यकर्त्यांचा प्रवेश होऊन राष्ट्रवादीचे काही नगरसेवक ही मुख्यमंत्र्याच्या हस्ते गळ्यात माळ टाकून घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. एकंदरीत या राजकीय भूकंपामुळे राष्ट्रवादीचा मात्र पोळा फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Body:हिंगोली जिल्ह्यात 30 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा दाखल होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात राजकिय भूकंप होण्याची शक्यता आहे. असेही जिल्ह्यात महिनाभरापासून दबक्या आवाजात भाजप प्रवेशाची चर्चा होत असली तरी या तीन ते चार दिवसापासून तर उघड उघड चर्चा रंगू लागली आहे. अजूनतरी भाजपात प्रवेश करणाऱ्यांची संख्या आकडेवारीत सांगितली जात आहे. काही काही जण तर स्पष्ट नावांचा ही उल्लेख करीत आहेत. मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीतच पोळा फुटल्यानंतर ते खरे चेहरे समोर येणार आहेत. यात मुख म्हणजे हिंगोली नगर पालिकेचे सात राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपात प्रवेश करणात असल्याचे स्पष्ट झाले असले तरी अजून दोन राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकासाठी भाजपची ओढाताण सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळाले. ते दोन्ही राजी झाले तर 9 नगरसेवक मात्र भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा अजून तरी दबक्या आवाज सुरू आहे. मुख्यमंत्र्याच्याच उपस्थित बार होण्याची शक्यता आहे. का केवळ चर्चेचा फुसका बार ठरतोय याकडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Conclusion:भाजपला सत्येत येऊन पाच वर्षे पूर्ण झालेली असल्याने भाजपच्या वतीने सेनगाव येथे पाचवा वर्षपूर्ती मेळाव्याचे आयोजन केले आहे.
मतदार संघात पाच वर्षात भाजप च्या वतीने करण्यात आलेल्या कामाचा लेखा जोखा मांडला जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी पालकमंत्री अतुल सावे, राज्य कृषी मूल्य आयोग अध्यक्ष पाशा पटेल, प्रदेश प्रवक्ता गणेश हाके, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, संघटन मंत्री भाऊराव देशमुख, माजी खा. शिवाजी माने, आ.तान्हाजी मुटकुळे आदींची उपस्थिती राहणार आहे. या देखील कार्यक्रमात अनेकजण भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
तर राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चांगलंच उफाळल्याने याची कुणकुण विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांच्या कानावर गेली. त्यांनी नाराज नगरसेवकासी संपर्क साधला. अन राष्ट्रवादीचे नगरसेवक मुंढेच्या भेटीला परभणीत गेल्याची चर्चा आहे. तेथे नगरसेवकांच्या मुंढे यांनी अडचणी समजून घेतल्या. तर दुसरीकडे मात्र भाजपचे पदाधिकारी प्रवेश करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची आकडेवारी गिरवत आहेत.त्यामुळे आता खरोखरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा पोळा फुटतोय की नाही, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

या बातमीत मुख्यमंत्र्याचा फाईल फोटो वापरावा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.