ETV Bharat / state

हिंगोली लोकसभेच्या जागेसाठी नांदेडच्या दोन आजी-माजीत चुरस - Rajiv Satav

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून नांदेडच्या हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसच्या उमेदवाराकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. तर आता शिवसेनेकडून पराभूत झालेल्या सुभाष वानखेडे यांना काँग्रेसने उमेदवारी घोषित केली.

शिवसेना उमेदवार हेमंत पाटील आणि काँग्रेस उमेदवार सुभाष वानखेडे
author img

By

Published : Mar 25, 2019, 3:37 PM IST

हिंगोली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून नांदेडच्या हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसच्या उमेदवाराकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. तर आता शिवसेनेकडून पराभूत झालेल्या सुभाष वानखेडे यांना काँग्रेसने उमेदवारी घोषित केली. त्यामुळे हिंगोली लोकसभेसाठी नांदेडच्या आजी माजीत चुरस होणार आहे. मात्र, आपल्यालाही काँग्रेस कडून उमेदवारी मिळेल अशी आशा बाळगून असलेल्या भाजपच्या एका दिग्गजाची निराशा झाली आहे.

हिंगोली लोकसभेसाठी बहुजन वंचित आघाडीकडून मोहन राठोड, तर शिवसेना भाजप युतीकडून हेमंत पाटील आणि काँग्रेसकडून आता सुभाष वानखेडे लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणुकीला गती आली आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात भाजपमध्ये जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक जास्त असताना देखील हिंगोलीसारख्या मागासलेल्या जिल्ह्यात मात्र, भाजपचे अनेक दिग्गज काँग्रेसच्या संपर्कात असल्याची परिस्थिती होती. भाजपच्या दोघांच्या नावाची चर्चा जोरात होती. त्यातच राजीव सातव यांचे देखील नाव समोर येत होते. मात्र, अचानक काँग्रेसकडून सुभाष वानखेडे यांना उमेदवारी निश्चित झाल्याने बरेचजण आश्चर्यचकित झाले. मात्र, सेनेतून भाजप अन् भाजपमधून थेट काँग्रेसमध्ये प्रवेश करत तिकीट घेतल्याने राजीव सातव यांनी लोकसभेतून माघार घेतल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

नांदेडचे असलेल्या दोन्ही दिग्गजांमध्ये चांगलीच चुरस होणार आहे. दोघांपैकी मतदार कोणत्या उमेदवाराला पसंती देतात हे निवडणूकीनंतरच कळणार आहे. एवढेच नव्हे तर शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेले हेमंत पाटील यांनी हिंगोली येथील भाजप-सेना कार्यकर्त्यांची भेट घेऊन काँग्रेसला लोकसभा लढवण्यास उमेदवारच मिळत नसल्याचे स्पष्ट सांगितले. त्यामुळे त्यांचा डोळा आमच्याच पदाधिकाऱ्यांवर असल्याच्या वावड्या उठत होत्या. तर आमचेच काही बंडखोर स्वतः च्या फायद्यासाठी काहीही करायला तयार आहेत. मात्र, आता या मतदार संघात काँग्रेसकडून सुभाष वानखेडे तर शिवसेनेकडून असलेले हेमंत पाटील यांच्या लढत होणार आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोडही गतीने कामाला लागले आहेत.

मागील काही दिवसांपासून हिंगोलीसाठी राजीव सातव यांचे तळ्यात-मळ्यात सुरू होते. मात्र, सातव यांच्यावर पक्षाने गुजरात राज्यातील विधानसभा व आता लोकसभेची जबाबदारी सोपवली आहे. तसेच सातव यांना राहुल गांधी यांचे विश्वासू म्हणून मानले जाते. त्यामुळे त्यांची माघार असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. मात्र, मागच्या निवडणुकीत सातव यांनी १६३२ मतांनी पराभव केला होता. खरे पाहता सातव यांच्या कामगिरी बद्दल त्यांना दोन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला होता. मात्र, गुजरात राज्याची जबाबदारी सांगत माघार घेतली की, दुसरेच काही कारण आहे, याचा अजून तरी शोध लागलेला नाही.

या निवडणुकीत काय परिस्थिती राहणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात हिंगोलीतील तीन नांदेड मधील दोन आणि यवतमाळ जिल्ह्यातील एक अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे उमेदवारांना क्लिष्ट अशा भौगोलिक रचना आणि विविध प्रश्नांतून मतदारांसमोर जावे लागणार आहे.

Intro:आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून नांदेड च्या हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसच्या उमेदवाराकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. तर आता शिवसेनेकडून पराभूत झालेल्या सुभाष वानखेडे यांना काँग्रेसने उमेदवारी घोषित केली. त्यामुळे हिंगोली लोकसभेसाठी नांदेडच्या आजी माजीत चुरस होणार आहे. मात्र आपल्यालाही काँग्रेस कडून उमेदवारी मिळेल अशी आशा बाळगून असलेल्या भाजपच्या एका दिग्जची बाब्या बी गेला अन दशमी बी गेली अशीच गत होऊन बसलीय.

Body:हिंगोली लोकसभेसाठी बहुजन वंचित आघाडीकडून मोहन राठोड, तर शिवसेना भाजप युतीकडून हेमंत पाटील आणि काँग्रेस कडून आता सुभाष वानखेडे लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. त्यामुळे आता निवडणुकीला गती अली आहे. शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या उमेदवाराकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच लक्ष लागले होते. वास्तविक पाहता महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात भाजप मध्ये जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक जास्त असताना देखील हिंगोली सारख्या मागासलेल्या जिल्ह्यात मात्र भाजपचे अनेक दिग्ज काँग्रेसच्या संपर्कात असल्याची उलट परिस्थिती होती. त्यामुळे भाजपच्या दोघांच्या नावाची चर्चा जोरात होती. त्यातच कधी मधी राजीव सातव यांचे देखिल नाव समोर येत होते. मात्र अचानक काँग्रेस कडून सुभाष वानखेडे यांना उमेदवारी निश्चित झाल्याने बरेच जण आचर्य चकित झाले. मात्र सेनेतून भाजप अन भाजप मधून थेट काँग्रेस मध्ये प्रवेश करत तिकीट घेतल्याने राजीव सातव यांनी लोकसभेतून माघार घेतल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आता नांदेडचे असलेल्या दोन्ही दिग्ज मध्ये चांगलीच चुरस होणार असल्याने दोन्ही पैकी मतदार कोणत्या उमेदवाराला पसंती देतात. हे निवडणूक प्रकिया पार पडल्यानंतरच कळणार आहे. एवढेच नव्हे तर शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेले हेमंत पाटील यांनी हिंगोली येथील भाजप सेना कार्यकर्त्यांची भेट घेऊन घेतलेल्या बैठकीत काँग्रेसला लोकसभा लढवण्यास उमेदवारच मिळत नसल्याचे स्पष्ट सांगितले. त्यामुळे त्यांचा डोळा आमच्याच पद्धधिकाऱ्यांवर असल्याच्या वावड्या उठत होत्या. तर आमचेच काही बंडखोर स्वतः च्या फायध्यासाठी काहीही करायला तयार आहेत. मात्र आता या मतदार संघात काँग्रेस कडून सुभाष वानखेडे तर शिवसेनेकडून असलेले हेमंत पाटील यांच्या लढत होणार आहे. त्यातच वंचीत बहुजन आघाडीचे मोहन राठोड ही गतीने कामाला लागले आहेत.

Conclusion:वास्तविक पाहता मागील काही दिवसांपासून हिंगोलीसाठी राजीव सातव यांचे तळ्यात मळ्यात सुरू होते. मात्र सातव यांच्यावर पक्षाने गुजरात राज्यातील विधानसभा व आता लोकसभेची जबाबदारी एव्हढेच नव्हे तर राहुल गांधी यांचे विश्वसू म्हणून सातव असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांची माघार असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्यात. मात्र मागच्या निवडणुकीत सातव यांने १६३२ मताने प्रभाव केला होता. खरे पाहता सातव यांच्या कामगिरी बद्दल त्याना दोन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला होता. मात्र आता गुजरात राज्याची जबाबदारी सांगत माघार घेतली की दुसरेच काही. याचा अजून तरी शोध लागलेला नाही. या निवडणुकीत काय परिस्थिती राहणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात हिंगोलीतील तीन अन नांदेड मधील दोन , यवतमाळ जिल्ह्यातील एक आशा सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. त्यामुळे उमेदवाराना क्लिष्ट आशा भौगोलिक रचना विविध प्रश्नाचे वैविध्या तुन मतदारा समोर जावे लागणार आहे. हे ही मात्र तेव्हढेच खरे!

सुभाष वानखेडे अन हेमंत पाटील यांचा फोटो मेल केलेला आहे बातमीत वापरावे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.