हिंगोली - जिल्ह्यातील जामठी खुर्द परिसरात तीन दिवसांपूर्वी हरणाची शिकार करून त्याचे मांस विभक्त केले जात होते. ही बाब वन विभागाला समजताच वनरक्षक अनिल राठोड यांने घटनास्थळी धाव घेतली अन शिकाऱ्याने मांस जाग्यावरच सोडून पलायन केले. मात्र, सुदृढ असलेला वनरक्षक एकाही शिकाऱ्याला पकडू शकला नाहीत. घटनेला तीन दिवस उलटून गेले असले तरी ही अजून या प्रकरणात कोणतीही कारवाई झालेली नाही. वन्य प्राण्यांचे अवशेष सापडलेले असतानाही वन विभाग अजूनही प्रयोगशाळेकडून येणाऱ्या अहवालाची प्रतीक्षा करत आहे. करवाई करून शिकाऱ्यावर वचक बसविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वन्यप्राण्यांच्या शिकारीची संख्या वाढली आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी औंढा नागनाथ तालुक्यात ही एका वन्यप्राण्याची शिकार केली होती. पुन्हा जामठी (खु.) परिसरात हरणाची शिकार केली होती. या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. तो पर्यंत शिकऱ्याने मांस जाग्यावर सोडून पळ काढला. घटनास्थळी पडलेले हरणाचे अर्धवट अवशेष, शिकारीसाठीचे जाळे आदी साहित्य जप्त केले. त्याचे काही अवशेष प्रयोगशाळेकडे नमुना तपासणीसाठी पाठवलेले आहेत. त्याची अजूनही प्रतीक्षा वनविभागाला लागलेली आहे. विशेष म्हणजे वनविभाग सुदृढ वनरक्षकाचीच भरती करते. मात्र, वनरक्षक एकही शिकारी पकडू शकला नाही, यामुळे वनविभागाच्या सक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
हेही वाचा - हिंगोलीत पुन्हा एका वन्यप्राण्याची हत्या करून शिकारी फरार
वनविभागातील जवनांकडे शिकाऱ्याच्या गाडीच्या नंबर प्लेटचे फोटो आहेत. तरीही शिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागत आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वनविभागाकडून सांगत आहे. आता नेकमा गुन्हा दाखल कधी होणार याकडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे.