ETV Bharat / state

CORONA : लॉकडाऊनमुळे 'पान'मळ्यांचा रंग उतरला, शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी - farmer in trouble in corona lockdown

पानकनेरगाव येथे पारंपरिक पद्धतीने पान मळ्यांची लागवड केली जातेय. जवळपास एकेक शेतकरी एक ते दीड एकरामध्ये पान मळ्यांची लावगड करत असत. तीनशे ते चारशे पान मळ्यांची संख्या होती. त्यामुळे गावाची ओळखच पानकनेरगाव म्हणून पडली. येथील विड्याचे पान खूप प्रसिद्ध असून आता दिवसेंदिवस हे मळे नष्ट होत चालले आहेत. एकेकाळी शेकडो हेक्टरमध्ये लागवड होणारे मळे गुंठ्यावर येऊन ठेपले आहेत. अन अशाच परिस्थितीत लॉकडाऊन आल्याने, शेतकऱ्यांना काय करावे, काय नाही हेच कळेनासे झाले आहे.

कोरोना इफेक्ट्स : लॉकडाऊन तोडणीस आलेली पान मळ्यातच पडून; शेतकऱ्याचे स्वप्न भंगले

author img

By

Published : May 21, 2020, 3:48 PM IST

हिंगोली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार बंद झालेले आहे. गुंतवणूकदारांच्या तर स्वप्नांवर अक्षरशः पाणी फिरले आहे. यात शेतकऱ्यांचेही खूप नुकसान झाले आहे. एकेकाळी पान मळ्यांची संख्या सर्वाधिक जास्त असल्याने, त्या गावाचीच ओळख पानकनेरंगाव अशी होऊन गेलीय. मात्र लॉकडाऊनमुळे पान टपरी, लग्नसराई सर्व काही बंद असल्याने, तोडणीस आलेली पाने शेतातच सडत असल्याचे चित्र आहे.

कोरोना लॉकडाऊनमुळे 'पान'मळ्यांचा रंग उतरला, शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे एकेकाळी तीनशे ते चारशे पानमळे असत. एकरावरील पानमळे आता गुंठ्यावर येऊन ठेपले आहेत. मोजक्याच शेतकऱ्यांकडे आता पानमळे उरले असून, या शेतकऱ्यांची देखील लॉकडाऊनमुळे त्यांची मोठी दैना होत आहे. रामभाऊ आकमार यांचा दहा गुंठ्यांत पान मळा आहे. त्यांनी या पान मळ्यावर अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न देखील केले. मात्र बँकेने जवळदेखील उभे करून घेतले नाही. कशीबशी पैशाची जुळवाजुळव करून पानमळा उभारला. पानमळ्यांचे फिटून पैसे काही तरी पदरात पडतील, हा विश्वास देखील रामराव यांना होता. या वर्षी पाणी पातळी मुबलक असल्याने योग्य वेळेत पाणी, खताची मात्रा दिली. यावर साधारणतः 30 ते 40 हजार रुपये खर्च आला, तो खर्च यावर्षी वसूल होईल, अशी अपेक्षा रामराव यांना होती, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व स्वप्नांवर पाणीच फिरले आहे. एकेकाळी नांदेडपर्यंत जाणारी पानकनेरगाव येथील नागवेलीची पाने लॉकडाऊनमुळे शेतात सडून जात आहेत. तोडणीयोग्य आलेली पाणी तोडून न्यावेत तरी कुठे, असा प्रश्न या शेतकऱ्याला पडला आहे.

कोरोना इफेक्ट्स : लॉकडाऊन तोडणीस आलेली पान मळ्यातच पडून; शेतकऱ्याचे स्वप्न भंगले
कोरोना इफेक्ट्स : लॉकडाऊन तोडणीस आलेली पान मळ्यातच पडून; शेतकऱ्याचे स्वप्न भंगले

नियोजन फिस्कटले
खरे तर, या पान विक्रीतून दर वर्षी खरीप पेरणीची तयारी केली जात असे. दर वर्षी 70 ते 80 हजार रुपयांची नागवेलीची पाने विक्री होत असत. येथील पान हे चविष्ट अन् परंपरागत असल्याने जास्तीत येथेच पान खरेदी करण्यासाठी नागरिक धाव घेतात, लग्नकार्य, पानटपरीधारक जाग्यावरून 30 ते 40 रु. शेकड्याप्रमाणे पान खरेदी करत. या वर्षी, मळा दर्जेदार बनविला असून, पानेही चांगली लागली आहेत. चांगला नफा होईल, असे वाटत असतानाच लॉकडाऊन मानगुटीवर येऊन बसलाय. त्यामुळे काय करावे अन् काय नाही, अशी अडचण आता शेतकऱ्यासमोर निर्माण झाली आहे. निदान शासन स्तरावर तरी आता नुकसान झालेल्या पान-मळ्यांचा सर्वेक्षण करून नुकसान भरपाई तरी मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी रामराव आकमार यांनी व्यक्त केलीय.

एकरावरील पान मळे आलेत गुंठ्यावर
पानकनेरगाव येथे पारंपरिक पद्धतीने पान मळ्यांची लागवड केली जातेय. जवळपास एकेक शेतकरी एक ते दीड एकरामध्ये पान मळ्यांची लावगड करत असत. तीनशे ते चारशे पान मळ्यांची संख्या होती. त्यामुळे गावाची ओळखच पानकनेरगाव म्हणून पडली. येथील विड्याचे पान खूप प्रसिद्ध असून आता दिवसेंदिवस हे मळे नष्ट होत चालले आहेत. एकेकाळी शेकडो हेक्टरमध्ये लागवड होणारे मळे गुंठ्यावर येऊन ठेपले आहेत. अन अशाच परिस्थितीत लॉकडाऊन आल्याने, शेतकऱ्यांना काय करावे, काय नाही हेच कळेनासे झाले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात आहे पानांची ओळख

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील पानाला संपूर्ण महाराष्ट्रात मागणी आहे. भुसावळ, पुणे, ठाणे, मुंबई आदी ठिकाणावरून व्यापारी या पानांची मागणी करीत असत. पान पाहण्यासाठी आल्यानंतर सोबतच घेऊन देखील जात असल्याने वेळेत पैसे ही मिळत असत, त्यामुळे हा पानाचा व्यवसाय व्यवस्थित वाटू लागला. मात्र, या वर्षी लॉकडाऊनमुळे संपूर्ण दिवाळे निघाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.