ETV Bharat / state

दिलासादायक! हिंगोली जिल्ह्यासाठी ११ हजार २०० कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध - हिंगोली जिल्हा कोरोना लसीकरण बातमी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यामध्ये लसींचा तुडवडा असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने, खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत याबाबतचा आढावा घेतला.

Mp hemant patil
खासदार हेमंत पाटील
author img

By

Published : May 1, 2021, 10:40 AM IST

Updated : May 1, 2021, 11:37 AM IST

हिंगोली - जगभरात हाहाकार केलेल्या कोरोनाला हरवण्यासाठी यंत्रणा अहोरात्र परिश्रम घेत आहे. अशा परिस्थितीत कोरोना प्रतिबंधक लस अत्यंत सुरक्षित असून १ मे पासून जिल्ह्यात सुरु होणाऱ्या सर्वसमावेशक लसीकरणासाठी ११ हजार २०० लस उपलब्ध करून दिल्या आहेत. या लसीकरणाचा लाभ हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यामध्ये लसींचा तुडवडा असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने, खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत याबाबतचा आढावा घेतला.

हिंगोली जिल्ह्यासाठी लस उपलब्ध करून देण्यासाठी खासदार पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार विभागीय उपायुक्त यांना निर्देश दिले होते. तत्काळ १० हजार कोविशील्ड आणि १२०० कोवॅक्सिन असे एकूण ११ हजार २०० लस उपलब्ध करून दिल्या आहेत.

नागरिकांनी घाबरून न जाण्याचे केले आवाहन -

कोरोना प्रतिबंधक लसीबाबत देशातील जनतेमध्ये भीती आणि शंका आहेत. याबाबत जनजगृती करुन मोठ्या प्रमाणात नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले. हिंगोली जिल्ह्यासाठी आजवर ६० हजार लस उपलब्ध झाल्या असून त्यापैकी ५४ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता.

१८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण -

१ मेपासून देशात १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे. आगामी काळात मोठ्या प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होणार आहे. लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी जिल्ह्यात ६२ ठिकाणी लसीकरण केंद्र चालू करण्यात येणार असून, गरजेनुसार केंद्र वाढविण्यात येतील, असेही खासदार पाटील म्हणाले. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरण पुन्हा जोरात सुरू होणार आहे. तरी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे, असेही खासदार पाटील म्हणाले.

Last Updated : May 1, 2021, 11:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.