ETV Bharat / state

Hingoli Commissioner Meeting : लसीकरणाची चुकीची माहिती देणाऱ्या मुख्याधिकाऱ्याला आयुक्तांनी बैठकीतून हाकलले

आयुक्त सुनील केंद्रेकर हे हिंगोली जिल्हा ( Sunil kendrekar On Hingoli Tour ) दौऱ्यावर आले असून त्यांनी जिल्हाधिकार्यालयातील सभागृहात बैठक घेऊन जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी कळमनुरीच्या मुख्याधिकाऱ्यांनी लसीकरणाची चुकीची माहिती सांगितल्याने त्यांना ( Hingoli Commissioner Covid Meeting ) बैठकीतून बाहेर हाकलले.

Hingoli Commissioner Covid Meeting
Hingoli Commissioner Covid Meeting
author img

By

Published : Dec 16, 2021, 7:46 PM IST

Updated : Dec 16, 2021, 8:58 PM IST

हिंगोली - आयुक्त सुनील केंद्रेकर हे हिंगोली जिल्हा ( Sunil kendrekar On Hingoli Tour ) दौऱ्यावर आले असून त्यांनी जिल्हाधिकार्यालयातील सभागृहात बैठक घेऊन जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी कळमनुरीच्या मुख्याधिकाऱ्यांनी लसीकरणाची चुकीची माहिती सांगितल्याने त्यांना ( Hingoli Commissioner Covid Meeting ) बैठकीतून बाहेर हाकलले. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. यावेळी बोलताना केंद्रेकर यांनी आम्ही ओमायक्रॉनच्या लाटेची तयारी करत असल्याची माहिती दिली.

प्रतिक्रिया

अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना लसीचा घेतला आढावा -

संपुर्ण देशात तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने, प्रशासन सज्ज झाले आहे. त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आलेले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना लसीचा आढावा घेतला. यावेळी कळमनुरीच्या मुख्याधिकाऱ्यांनी लसीकरणाची चुकीची माहिती सांगितल्याचे लक्षात येताच, केंद्रेकर यांनी त्यांना बैठकीतून बाहेर हाकलले. राज्यात ओमायक्रॉनच्या विषाणूची लाट येण्याची शक्यता असताना ही हिंगोली जिल्ह्यातील लसीकरण कमी कसे, यावरून केंद्रेकर चांगलेच संतापले. भयंकर परिस्थिती निर्माण होण्याअगोदर गांभीर्याने घेणे गरजेचे असताना अधिकारी कर्मचारी काम का करत नाहीत, असा सवाल करत, अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत लसीकरण पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर न सोडण्याच्या सूचना आयुक्त केंद्रेकर यांनी सर्वच यंत्रणेला दिल्या.

चुकीची माहिती ताबडतोब आली लक्षात -

सध्या कोरोना लसीकरणाच्या आकड्याकडे प्रशासनाचे लक्ष लागले असून, पुढील लाटेचा सामना करण्यासाठी लसीकरण हे नितांत गरजेचे आहे. त्यामुळे लसीकरणाची आकडेवारी शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करावे, अशा परिस्थितीमध्ये लसीकरणाचा आढावा घेत असताना कळमनुरीच्या मुख्याधिकारी यांनी चुकीची आकडेवारी सांगितली. त्यामुळे त्यांना थेट बैठकीतून बाहेर हाकलण्यात आले. या प्रकारामुळे अधिकाऱ्यांमध्ये मात्र खळबळ उडाली आहे.

'आई वडिलांची तर सेवा कराच, मात्र वयोवृद्धांचाही सन्मान करा' -

आपण ज्या विभागामध्ये कार्यरत आहोत. त्या विभागांमध्ये येणार्‍या वयोवृद्धांची कामे पूर्ण करा, त्यांचा अपमान होणार नाही, याची काळजी घ्या, सोबतच आपल्या आईवडिलांचीदेखील सेवा करा. आदी सुचना देखील त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिल्या. तसेच 60 वर्ष वयोवृध्द व्यक्तीचे देखील लसीकरण झालेच पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी वृद्धांना आधार म्हणून एक काठी, बॅटरी, माफरेल आदींचे वाटप करण्यात आले.

हेही वाचा - Bala Nandgaonkar leave MNS? : बाळा नांदगावकर मनसे सोडणार का? खुलासा करत म्हणाले..

Last Updated : Dec 16, 2021, 8:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.