ETV Bharat / state

औंढा नागनाथ महाशिवरात्री महोत्सव रद्द; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय - औंढा नागनाथ महाशिवरात्री महोत्सव रद्द न्यूज

औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिरात वर्षानुवर्षाची परंपरा असलेला महाशिवरात्रीचा मोठा उत्सव साजरा होतो. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक आवर्जून हजेरी लावतात. यामध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणीय असते. यावर्षी मात्र, कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने हा महोत्सव रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत.

Aundha nagnath Temple
औंढा नागनाथ मंदिर
author img

By

Published : Feb 25, 2021, 9:41 AM IST

हिंगोली - देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील महाशिवरात्री उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महादेवाचा रथ हे यातील मुख्य आकर्षण असते. मात्र, यावर्षी जिल्ह्यातील कोरोनाचा संकट पाहता ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी घेतला आहे. त्याबाबत त्यांनी आदेश काढले आहेत. औंढा नागनाथ संस्थानच्यावतीने महाशिवरात्री महोत्सवाची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. 9 ते 14 मार्च या कालावधीमध्ये हा महोत्सव पार पडणार होता. मात्र, आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे हा महोत्सव रद्द करण्यात आला आहे.

औंढा नागनाथ यात्रेत वापरला जाणारा रथ
औंढा नागनाथ यात्रेत वापरला जाणारा रथ
10 मार्च रोजी होणार होती संस्थांकडून महापूजा -

नागनाथ मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री साडेबारा वाजता संस्थांचे पदसिद्ध अध्यक्ष, सल्लागार, वकील संघाचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये महापूजेचे आयोजन केले जाते. या पुजेसाठी देखील मोठ्या संख्येने भाविक आवर्जून हजर राहतात. त्यानुसार यंदाच्या महाशिवरात्रीनिमित्त 10 मार्च रोजी मध्यरात्री महापूजेचे आयोजन केले होते. त्यासाठी जोरदार तयारी सुरू होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढल्यानंतर ही महापूजा अतिशय साध्या पद्धतीने होणार आहे.

जिल्ह्यात 140 रुग्णांवर उपचार सुरू -

हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ झाली आहे. सध्या 140 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 3 हजार 755 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता हिंगोली प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले. कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. सध्या मंदिरात दर्शन सुरू असून कोरोना नियमाचे पालन करून भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.