ETV Bharat / state

हिंगोलीत भाविकांची चिंतामणी विघ्नहर्ता गणपतीचा दर्शनासाठी अलोट गर्दी - मोदक

हिंगोलीच गणेश विसर्जनाचा आजचा दिवस अत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान, श्री चिंतामणी विघ्नहर्ता गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक हिंगोलीत दाखल झाले असून भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी हिंगोलीकर काळजी घेत आहेत.

हिंगोलीत चिंतामणी विघ्नहर्ता गणपती
author img

By

Published : Sep 12, 2019, 6:29 PM IST

हिंगोली - शहराचे वैभव असलेल्या श्री चिंतामणी विघ्नहर्ता गणपतीच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक हिंगोलीत दाखल झाले आहेत. भाविकांचे दर्शन शांततेत व्हावे यासाठी संस्थेच्या वतीने जागोजागी लांबलचक दर्शन रांगा लावण्यात आल्या आहेत. गतवर्षीपेक्षा यावर्षी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे संस्थेचे सचिव दिलीप बांगर यांनी सांगितले. विशेष म्हणजे या विघ्नहर्त्याची ख्याती सर्वदूर असल्याने परराज्यातूनही भाविक याठिकाणी दाखल होतात. हे दानपेटीतील निघालेल्या वेगवेगळ्या दानातून स्पष्ट झाले आहे.

हिंगोलीत चिंतामणी विघ्नहर्ता गणपती

हेही वाचा - 'दंगल गर्ल'ने दिला पोलीस उपनिरीक्षकपदाचा राजीनामा, भाजपकडून निवडणूक लढवणार?

हिंगोलीत आजच्या दिवसाची वर्षभरापासून प्रतीक्षा केली जाते. हिंगोलीचा श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती हा नवसाला पावणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मुख्य असलेले मोदक घेण्यासाठी भाविक आवर्जून हजेरी लावतात, यानंतर या मोदकाची वर्षभर पूजा करतात आणि मनोकामना पूर्ण झाल्यानंतर या विघ्नहर्त्याला मोदक वाहतात, ही आता याठिकाणी परंपराच होऊन गेली आहे. त्यामुळे नवसाला पावणारा गणपती म्हणून या विघ्नहर्त्याची ओळख निर्माण झाली आहे. यामुळे गणपतीच्या दर्शनासाठी भाविक कालपासून हिंगोलीमध्ये दाखल झाले आहेत, भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून विविध संघटना, मोटर संघटना, मेडिकल असोसिएशन अशा वेगवेगळ्या संघटनांनी भाविकांना दर्शन रांगेपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केलेली आहे. यासोबतच दर्शन रांगेत थांबलेल्या भाविकांना पाणी, प्रसाद तसेच हिंगोलीच्या खाद्यमध्ये स्वयंपूर्ण ओळख असलेली प्रसिद्ध खिचडी आणि भजे देखील भाविकांना वाटप केले जात आहेत. दरम्यान, पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील मंदिर परिसरात व शहरातील इतर भागात चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्याने अनुचित प्रकाराला आळा बसण्यास मदत झाली आहे. हिंगोली पोलीस विभाग, मी हिंगोलीकर प्रतिष्ठान पुणे, केमिस्ट असोडिअशन हिंगोली, स्नेहल नर्सिंग होम यांच्या वतीने रांगेत उभे असलेल्या भाविकाला आरोग्य सुविधा पुरवण्यात येत आहेत.

हेहा वाचा - गणपती विसर्जन मिरवणूक: नाशिक ढोलच्या तालावर वाहतूक पोलिसांनी धरला ठेका

दरम्यान, हिंगोलीकर आजचा दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून दाखल झालेल्या भाविकांची जराही गैरसोय होऊ नये यासाठी हिंगोलीकर काळजी घेत आहेत. एवढेच नव्हे तर युवक वर्ग देखील या उत्सवामध्ये मोठ्या हिरीरीने सहभागी होऊन भाविकांना सेवा पुरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे आजच्या उत्साहात हिंगोलीकर स्वताला झोकून देत असल्याचे पाहून वयोवृद्ध देखील आवक झाले आहेत. यासोबतच या महोत्सवामध्ये स्वच्छतेची देखील मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे. जागोजागी कचरा पेट्या आणि स्वतः स्वयंसेवक रस्त्याची सफाई करत असल्याचे पहाण्यास मिळत आहे.

Intro: हिंगोलीचे वैभव असलेल्या श्री चिंतामणी विघ्नहर्ता गणपतीच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक हिंगोलीत दाखल झाले आहेत. भाविकांचे दर्शन शांततेत व्हावे यासाठी ट्रस्टचे
वतीने जागोजागी लांबलचक दर्शन रांगा लावलेल्या आहेत गतवर्षीपेक्षा यावर्षी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे ट्रस्टचे सचिव दिलीप बांगर यांनी सांगितले. विशेष म्हणजे या विघ्नहर्त्याची ख्याती सर्वदूर असल्याने परराज्यातूनही भाविक याठिकाणी दाखल होतात हे दानपेटीतील निघालेल्या वेगवेगळ्या ज्ञानातून स्पष्ट झाले आहे.

Body:हिंगोलीत आजचा दिवस म्हणजे नुसताच दिवस असतो या दिवसाची वर्षभरापासून प्रतीक्षा केली जाते हिंगोलीचा श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती हा नवसाला पावणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे त्याचबरोबर या ठिकाणी मुख्य असलेलं मोदक हे भाविक घेण्यासाठी आवर्जून हजेरी लावतात आल्यानंतर त्यांची वर्षभर पूजा करायची आणि मनोकामना पूर्ण झाल्यानंतर या विघ्नहर्त्या ला मोदक वाहायची ही परंपराच होऊन गेली त्यामुळे नवसाला पावणारा गणपती म्हणून या विघ्नहर्त्याची ओळखत झालेली आहे. या देवीच्या दर्शनासाठी भाविक कालपासून हिंगोली मध्ये दाखल झालेले आहेत भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून विविध संघटना मोटर संघटना मेडिकल असोसिएशन अशा वेगवेगळ्या संघटनांनी भाविकांना दर्शन रांगेपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केलेली आहे. एवढेच नव्हे तर दर्शन रांगेत थांबलेल्या भाविकांना पाणी प्रसाद तसेच हिंगोली च्या खाद्य मध्ये स्वयंपूर्ण ओळख असलेले प्रसिद्ध खिचडी भजे देखील भाविकांना वाटप केले जात आहेत. एवढेच नव्हे तर पोलिस प्रशासनाच्या वतीने देखील मंदिर परिसरात व शहरातील इतर भागात चोख पोलिस बंदोबस्त ठेवल्याने अनुचित प्रकाराला आळा बसण्यास मदत झाली आहे. हिंगोली पोलीस विभाग, मी हिंगोलीकर प्रतिष्ठान पुणे, केमिस्ट असोडिअशन हिंगोली, स्नेहल नर्सिंग होम यांच्या वतीने रांगेत उभे असलेल्या भाविकाला चक्कर वैगेरे आली तर त्यांच्यावर उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले जात आहे अद्याप पर्यंत चार ते पाच अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना याची माहिती मिळाली आहे.

Conclusion:हिंगोली कर आजचा दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करतात संपूर्ण महाराष्ट्रातून दाखल झालेल्या भाविकांची जराही गैरसोय न होऊ देण्यासाठी हिंगोलीकर फार दक्षता पाहतात एवढेच नव्हे तर युवक वर्ग देखील या उत्सवांमध्ये मोठ्या हिरीरीने सहभागी होऊन भाविकांना सेवा पुरवण्यासाठी प्रयत्न करतात. विशेष म्हणजे आजच्या उत्साहात हिंगोलीकर स्वताला झोकून देत असल्याचे पाहून वयोवृद्ध देखील आवक झाले आहेत. एवढेच नव्हे तर या महोत्सवामध्ये स्वच्छतेचे देखील मोठ्या प्रमाणात काळजी घेण्यात आली आहे जागोजागी कचरा पेट्या आणि स्वतः स्वयंसेवक रस्त्याची सफाई करत असल्याचे पहावयास मिळाले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.