ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस; मात्र, कयाधू नदी कोरडीच

हिंगोली जिल्ह्यात मागील ५ ते ६ दिवसापासून पावसाने हजेरी लावली होती. एक दिवस विश्रांतीनंतर पाऊस दुसऱ्या दिवशीही कायमच आहे. तर पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांची मात्र चांगलीच हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे.

हिंगोली जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी
author img

By

Published : Aug 2, 2019, 8:05 PM IST

Updated : Aug 2, 2019, 8:25 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणी पाणी झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला असला तरीही नदी-नाल्यांना अद्याप पाणी वाहिलेले नाहीत. आतापर्यंत सरासरीच्या ३०.२७ टक्के पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे. हा पाऊस मात्र पिकांसाठी खूपच लाभदायक ठरत आहे.

हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस

हिंगोली जिल्ह्यात मागील ५ ते ६ दिवसापासून पावसाने हजेरी लावली होती. एक दिवस विश्रांतीनंतर पाऊस दुसऱ्या दिवशीही कायमच आहे. तर पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांची मात्र चांगलीच हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर मात्र पावसाचा वेग वाढल्याने पावसापासून बचाव करण्यासाठी नागरिक आसरा शोधत होते. तर पावसापासून बचाव करणाऱ्या साहित्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली दिसून येत आहे.

हिंगोली जिल्ह्यात मागील ८ ते १० दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शन झाले नाही. अधूनमधून पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेती कामेदेखील खोळंबत आहेत. सध्या शेतातील पिके हिरवीगार झाली असून वाढदेखील बऱ्यापैकी झाली आहे. त्यामुळे शेतकरी शेतीची खुरपणी व फवारणी करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पाऊस सुरू असल्याने शेतीची सर्वच कामे खोळंबत आहेत. दरम्यान, दर पावसाळ्यात हिंगोली जिल्ह्यातून दुथडी भरुन वाहणारी कयाधू नदी मात्र कोरडी दिसून येत आहे.

Intro:हिंगोली जिल्ह्यात सलग दुसर्‍याही दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे रस्त्यावर सर्वत्रच पाणी पाणी झाल यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ वाढले. दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला असला तरीही नदी-नाल्याना अद्याप पाणी वाहिलेले नाहीत. आतापर्यंत सरासरीच्या 30.27 टक्के पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे झालीय. हा पाऊस मात्र पिकांसाठी खूपच लाभदायक ठरत आहे.,

Body:हिंगोली जिल्ह्यात मागील पाच ते सहा दिवसात पासून सलग पावसाने हजेरी लावली होती एक दिवस विश्रांती नंतर सलग पाऊस दुसऱ्या दिवशीही कायमच आहे. गुरुवार पासून जिल्ह्यात पाऊस हजेरी लावत आहे पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांची मात्र चांगलीच हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली दुपारनंतर मात्र पावसाचा वेग वाढल्याने पावसापासून बचाव करण्यासाठी नागरिक आसरा शोधत होते. तर पावसापासून बचाव करणाऱ्या साहित्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली दिसून येत आहे.

Conclusion:हिंगोली जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शन झाले नाही. अधूनमधून पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेतीची देखील कामे खोळंबत आहेत. सध्या शेतातील पिके हिरवीगार झाली असून वाढदेखील बऱ्यापैकी झाली आहे त्यामुळे शेतकरी शेतीची खुरपणी व फवारणी करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र पाऊस सुरू असल्याने शेतीची सर्वच कामे खोळंबत आहेत. विशेष म्हणजे हिंगोली जिल्ह्यातून वाहत असलेल्या कयाधू नदीला यावर्षी एकदाही पूर्ण गेल्यामुळे कयाधु नदित मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जमा झालेले रस्त्यावरच दिसून येते. दर पावसाळ्यात दुथडी भरुन वाहणारी कयाधु नदी मात्र कोरडी दिसून येत आहे.
Last Updated : Aug 2, 2019, 8:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.