हिंगोली - वातावरणामध्ये आज (रविवारी) पहाटेपासूनच बदल जाणवत होता. अशा परिस्थितीत सायंकाळी पाचच्या सुमारास सेनगाव तालुक्यातील काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसाने काही प्रमाणात वातावरणात गारवा निर्माण झाला. तर अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली आहेत. जिल्ह्यात सायंकाळ पर्यंत सोसाट्याचे वारे सुरूच होते.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून तापमानाचा पारा हा 43 अंशावर जाऊन पोहोचला आहे. दुपारच्या वेळी तर बाहेर उन्हाचे चटके लागत आहेत. त्यामुळे बरेच जण बाहेर पडण्याचे टाळत आहेत. त्यातच कोरोनामुळे देखील काही जण बाहेर येत नाहीत. मात्र, अत्यावश्यक कामासाठी येणाऱ्यांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, आज (रविवारी) पावसाने जिल्ह्यातील काही भागात हजेरी लावल्यामुळे नागरिकांची उकाड्यापासून काही वेळ तरी सुटका झाली.
काही भागांत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाली. बाहेर गावावरून हातावर पोट असलेले कुटुंब मिळेल ते काम करून संसाराचा गाडा चालवत होते. रस्त्याच्या कडेला असलेली त्यांची झोपड्यांची, विविध दुकानांची दुर्दशा झाली.
सध्या खरीप हंगाम हा तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकरी शेती मशागतीकडे वळले आहेत. नुकतेच शेतकरी हे पेरणीच्या कामाला लागले आहेत. काही शेतकरी खते बी-बियाणे तर काहीजण शेतातील कामे आटपून घेत आहेत. मात्र, आजच्या या पावसामुळे शेतीच्या कामातही काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला.
हिंगोलीतील सेनगाव परिसरात वाऱ्यासह पावसाची हजेरी; अनेक घरांची पत्रे उडाली - वाऱ्यासह पावसाची हजेरी हिंगोली
हिंगोलीत आज (रविवारी) पावसाने जिल्ह्यातील काही भागात हजेरी लावल्यामुळे नागरिकांची उकाड्यापासून काही वेळ तरी सुटका झाली. काही भागांत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाली.