हिंगोली - शहरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. सध्या सोयाबीनचा हंगाम सुरू आहे. तर निवडणुकीचीही रणधुमाळी देखील सुरू आहे. मात्र, शेतकरी सोयाबीन झाकून टाकण्यासाठी धावपळ करत होते.
हेही वाचा - महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दल बोला.. कलम 370 नाही तर 371 बद्दल बोला - अशोक चव्हाण
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन कापणीला मागील काही दिवसापासून गती आली आहे. दिवस-रात्र एक करत शेतकरी सोयाबीन काढण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यातच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी देखील जोरदार सुरू असल्याने उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आपापल्या मतदारसंघात धाव घेत आहेत. अचानक हजेरी लावलेल्या पावसामुळे उमेदवारांचे मतदारांना भेटण्याचे नियोजन काही काळ कोलमडले होते. शेतकरी देखील सोयाबीन काढण्यात तल्लीन झालेले असताना, पावसाने हजेरी लावल्यामुळे सोयाबीनची काढणी करणाऱ्यांची देखील मोठी तारांबळ उडाली.
दोन दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक मोठ्या प्रमाणात वाढली होती. शुक्रवारी पावसाने हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांना मोटा फटका बसला आहे.
हेही वाचा - महायुतीच्या प्रचाराची आज मुंबईत सांगता, मोदी-ठाकरेंच्या संयुक्त सभेकडे लक्ष