ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस; हळदीचे नुकसान - हिंगोली न्यूज

हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी आज जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे हळदीसह भाजीपालावर्गीय पिकांचे मोठे नुकसान झाले.

Heavy rain in hingoli district
हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस
author img

By

Published : Apr 28, 2020, 4:24 PM IST

हिंगोली - हवामान खात्याने आज (मंगळवार) हिंगोली जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार आज काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे. कुरुंदकर परिसरात गारांचा तर सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा परिसरात जोराचा पाऊस होऊन हळदीसह भाजीपालावर्गीय पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरावरील टिन पत्रे उडून गेले.

हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस
हिंगोली जिल्ह्यात आज अचानक हजेरी लावलेल्या पावसामुळे हळद वाळवण्यासाठी टाकलेल्या शेतकऱ्यांची हळद झाकून टाकण्यासाठी एकच धांदल उडाली. तसेच भाजीपाला वर्गीय पिके देखील या पावसाने झोडपून काढली आहेत. वसमत तालुक्यातील कुरुंदा परिसरात तर गारांसह पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पावसापासून बचाव करण्यासाठी एकच घाई झाली.

जिल्ह्यात आज सकाळपासूनच वातावरण पूर्णता बदललेले आहे. दुपारी उकाडा जाणवत होता ढगाळ वातावरण देखील होते. अचानकच हजेरी लावलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अगोदरच कोरोनाच्या धास्तीने शेतातील अनेक कामे ठप्प आहेत. त्यात आज झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे काम पुन्हा वाढवून ठेवले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.