ETV Bharat / state

हिंगोलीत सामूहिक विवाह सोहळा संपन्न, अनाथ जोडप्याचाही समावेश

समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी धडपडणाऱ्या पारधी समाजातील एक जोडपे या सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झाले. कधी नव्हे ते एवढया मोठ्या जनसमुदायाचा आशीर्वाद मिळाल्याने नव्यानेच विवाह बंधनात अडकलेल्या जोडप्यासह त्यांच्या नातेवाईकांनींही समाधान व्यक्त केले.

हिंगोलीत सामूहिक विवाह सोहळा संपन्न
author img

By

Published : Mar 24, 2019, 11:44 PM IST

Updated : Mar 25, 2019, 12:18 AM IST

हिंगोली - येथील हरिओम कृषी शिक्षण विकास संस्था कोथळजच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात एकूण ५१ जोडपे विवाहबद्ध झाली. विशेष म्हणजे या ५१ जोडप्यांमध्ये एक पारधी समाजाच्या आणि अनाथ जोडप्याचाही समावेश होता.

समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी धडपडणाऱ्या पारधी समाजातील एक जोडपे या सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झाले. कधी नव्हे ते एवढया मोठ्या जनसमुदायाचा आशीर्वाद मिळाल्याने नव्यानेच विवाह बंधनात अडकलेल्या जोडप्यासह त्यांच्या नातेवाईकांनींही समाधान व्यक्त केले.

मागील वर्षापासून हरिओम कृषी विकास संस्थेच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. यावर्षी या विवाहसोहळ्यात अभिनेत्री किशोरी शहाणेसह राजकिय पुढारी तसेच शिवसेनेकडून नुकतीच उमेदवारी जाहीर झालेले आमदार हेमंत पाटील, आ. तान्हाजी मुटकुळे यांची उपस्थिती होती.

हिंगोलीत सामूहिक विवाह सोहळा संपन्न

या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन हरिओम कृषी विकास संस्थेचे अध्यक्ष दिलीप घुगे यांनी केले होते. त्यांच्या या उपक्रमामुळे खरोखरच शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याची भावनाही अनेकांनी व्यक्त केली. विवाहप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेली अभिनेत्री किशोरी शहाणे यांनीदेखील आपल्या जीवनाचा प्रवास सांगितला.

या विवाहसोहळ्यातील ५१ जोडप्यांना संसारासाठी उपयोगी असलेले साहित्य देण्यात आले. तसेच प्रमाणपत्रही देण्यात आले. शिवाय हजारोच्या संख्येने आलेल्या पाहुणे मंडळींची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. एकंदरीत दुष्काळ सदृश्य परिस्थितीत मात्र अशा दानशूरानी समोर येऊन असे सामुदायिक विवाह सोहळे घेण्याची गरज आहे. जेणेकरून निसर्गासमोर हतबल झालेल्या शेतकऱ्यांना धीर मिळेल.

Intro:हिंगोली येथे हरिओम कृषी शिक्षण विकास संस्था कोथळज च्या वतीने आयोजित विवाह सोहळ्यात एकूण ५१ जोडपे विवाहबद्ध झाली. विशेष म्हणजे आजही समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी धडपडनाऱ्या पारदी समाजातील ही एक जोडपे या सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झाले. कधी नव्हे ते एवढया मोठ्या जनसमुदायाचा आशीर्वाद आज मिळाल्याने नव्यानेच विवाह बंधनात अडकलेल्या जोडप्या सह त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.

Body:हिंगोली येथे मागील वर्षी पासून हरिओम कृषी विकास संस्थेच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. या वर्षी आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात ५१ जोडपे विवाहबद्ध झाली. विवाहप्रसंगी अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्यासह राजकिय पुढारी तसेच शिवसेनेकडून नुकतीच उमेदवारी जाहीर झालेले आमदार हेमंत पाटील , आ. तान्हाजी मुटकुळे मोठ्यासंख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. ऐन दुष्काळ सदृश्य परिस्थितीत सुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या हरिओम कृषी विकास संस्थेचे अध्यक्ष दिलीप घुगे यांच्यावर स्तुती सुमने पडत होती. एव्हढेच नव्हे तर त्यांच्या या उपक्रमामुळे खरोखरच शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याची भावना ही अनेकांनी व्यक्त केली. तर विवाहप्रसंगी प्रमूक पाहुण्या म्हणून उपस्थित असलेली अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी स्वतःच्या जीवनाचा प्रवास सांगत, आपणही प्रेम विवाह केला असून लग्नानंतर समजून घेणारी कोणती व्यक्ती असेल तर ती म्हणजे आपला पती. म्हणून म्हणतात ना ही रेशीम गाठ खूपच घट्ट असते, ते खरे आहे. तसेच आजही माझ्या आई वडीलाला काही झाले तर सर्व प्रथम माझें पती धाव घेतात. असे अनेक प्रसंग सांगत मोठ्या जनसमुदायात विवाह न केल्याची खंत व्यक्त केली. तसेच ५१ पैकी एक जोडपे अनाथ तर एक अतिशय गरीब घरचे अन हे पारधी समाजातील जोडपे संपूर्ण विवाह समारंभात सर्वांचे आकर्षण ठरत होते. पारधी समजातील जोडप्यांचे नातेवाईक तर एवढ्या मोठ्या दिलेल्या सुविधा मुळे भारवूनच गेले. या ठिकाणी प्रथम बौद्ध समाजातील विवाह बौद्ध रिवाजानुसार पार पडले. नंतर हिंदू समाजातील विवाह हिंदू रितीरिवाजानुसार पार पडला. बौद्ध समाजातील जोडप्यांना पांढरेशुभ्र वस्त्र तर हिंदु समाजातील जोडप्यांना शेरवानी देण्यात आली होती. या सोबतच वधुसाठी जोडवे, मंगळसूत्र, संसारउपयोगी साहित्य अन मेकअप पेटी, प्रमाणपत्र ही देण्यात आले. त्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले.

Conclusion:शिवाय हजारोच्या संख्येने आलेल्या पाहुणे मंडळींची भोजनाची गैरसोय होऊ नये म्हणून भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली होती. संख्या जास्त असल्याने काही प्रमाणात वाढण्याची अडचण झाली. मात्र प्रत्येकापर्यंत जेवण पोहोचविण्यासाठी आयोजकांची धडपड सुरू होती. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या विवाह प्रसंगात हजेरी लावलेल्या नेत्यांनी प्रारंभीच उपाशीपोटी असलेल्या वऱ्हाडी मंडळी समोर भाषण बाजी केल्याने वऱ्हाडी मंडळी हैराण झाली होती, ताटकळत उभे असलेले जोडपे बसले होते. त्यामुळे कुठे भाषण बाजी आटोपती घेत विवाहाला सुरुवात झाली. एकंदरीत दुष्काळ सदृश्य परिस्थितीत मात्र अशा दानशूरानी समोर येत असे सामुदायिक विवाह सोहळे घेण्याची गरज आहे. जनेकरून निसर्गा समोर हथबल झालेल्या शेतकऱ्याला धीर मिळेल. मात्र मुख्य म्हणजे ज्या युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यातील जोडप्याना मागील वर्षीप्रमाणे यंदा मोबाईल वरून शुभेच्छा दिल्या नाहीत.
Last Updated : Mar 25, 2019, 12:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.