कोरोनाच्या महाभंयकर काळात बांधकाम कामगाराना शासनाचा दिलासा - बांधकाम कामगाराना शासनाचा दिलासा
राज्य शासनाने कामगारांचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगाराच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ही आर्थिक मदत बांधकाम कामगाराच्या खात्यात डी.बी.टी. पध्दतीने जमा होणार आहे.

हिंगोली- कोरोना मुळे राज्यात सर्वच कामे ठप्प आहेत. अशात कामगारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाने कामगारांचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगाराच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ही आर्थिक मदत बांधकाम कामगाराच्या खात्यात डी.बी.टी. पध्दतीने जमा होणारे आहे. त्यामुळे कामगारांनी कोणाच्या ही भूल थापाना बळी पडण्याची अजिबात गरज नाही.
कोरोना सारख्या महाभयंकर आजारामध्ये लॉकडाऊन असल्याने, कोणावरही उपास मारीची वेळ येऊ नये म्हणून शासन अतिबारकाईने लक्ष ठेऊन आहे. हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेऊन शासनाने बांधकाम मजूरांना दोन हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात काही लोक (एजंट) तुम्हाला पैसे येणार आहेत. तुमचे कागदपत्र आमच्याकडे द्या असे सांगून बांधकाम कामगारांची फसवणुक करत असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारची व्यक्ती गावामध्ये किंवा बांधकाम कामगारास भेटल्यास त्याची तक्रार आपल्या जवळील पोलीस ठाण्यामध्ये द्यावी.
सदरील रक्कम ही कामगार आयुक्त मुंबई यांच्या मुख्यालयातुन टाकण्यात येणार आहे. त्यासाठी शासन कोणतेही अर्ज, फॉर्म भरुन घेणार नाही. त्यामुळे बांधकाम कामगारांनी दलालाच्या कोणत्याही भुल थापांना बळी पडू नये. लॉकडाऊनच्या काळात सेफ डिस्टन्सचे तंतोतंत पालन करुन कोठेही गर्दी करु नये व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा कामगार अधिकारी तात्याराव कराड यांनी केले आहे.