ETV Bharat / state

सेनगावात निर्माणाधीन पुलाच्या खड्ड्यात कार कोसळली; चौघांचा बु़डून मृत्यू

author img

By

Published : Jun 14, 2021, 9:41 AM IST

Updated : Jun 14, 2021, 9:59 AM IST

जिल्ह्यात सध्या रस्त्याचे जाळे तयार होत आहे. त्यापैकीच सेनगाव जिंतूर रस्त्याचेही काम जोरात सुरू आहे. याच रस्त्यावरच्या एका नाल्यावरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी नाल्यात मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. मात्र, या ठिकाणी पुलाचे काम चालु असल्याचा कोणताही सूचना फलक लावण्यात आला नाही. परिणामी रविवारी रात्रीचा हा अपघात त्यामुळेच झाला असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे.

सेनगावात निर्माणाधीन पुलाच्या खड्ड्यात कार कोसळली

हिंगोली- जिल्ह्यातील सेनगाव येथे जिंतूर महामार्गावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. अर्धवट बांधकाम असलेल्या या पुलाच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात कार पडून चौघा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघात रविवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. मृतांची ओळख पटली नसून हे सर्व लोणार तालुक्यातील खळेगाव, पळसखेडा येथील रहिवासली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

सेनगाव ते जिंतूर या राज्यमहामार्गावर नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. याच महामार्गावरील पुलाचे बांधकाम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यासाठी नाल्यात खोदलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. मात्र, त्या ठिकाणी कोणताही फलक नसल्याने वाहनचालकांना तो खड्डा लक्षात येत नाही. त्यामुळे अनेक वाहनांना अपघाताला सामोरे जावे लागत असल्याच्या घटना घडल्या आहेत. रविवारी रात्री एक कार या मार्गाने जात असताना रात्रीच्या सुमारास पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी हा पाण्याने भरलेला खड्डा कारचालकाच्या लक्षात आला नाही. त्यामुळे ही कार त्या खड्ड्यात गेल्याने कारमधील चारही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

दुचाकीस्वरांच्या लक्षात आली घटना-

या घनटेनंतर काही वेळातच एक दुचाकीस्वार त्या मार्गाने जात असताना त्याला खड्ड्यामध्ये कारची लाईट दिसून आली. त्यावेळी या ठिकाणी अपघात झाला असल्याचा अंदाज या दुचाकीस्वारास आला. त्याने तातडीने जवळच्याच एका धाब्यावर जाऊन तिथे या घटनेची माहिती दिली. त्यानंतर सर्वांंनी घटनास्थळी धाव घेऊन कार मधील चारही जणांना कार बाहेर काढले आणि तत्काळ सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून चौघांनाही मृत घोषित केले.

वळण रस्त्यावर फलक नसल्याने अपघात-
वास्तविक पाहता गेल्या अनेक महिन्यापासून सदरील पुलाचे बांधकाम हे प्रगतीपथावर आहे. अहोरात्र काम सुरू असूनही बांधकाम अद्याप अर्धवट आहे. शिवाय बांधकाम ठेकेदाराने या ठिकाणी कोणताही सूचना फलक बसवला नाही. त्यातच हा रस्त वळणाचा असल्याने वाहन चालकांच्या रस्ता सुरू असलेल्या पुलाचे काम लक्षात येत नाही. त्यातूनच ही घटना घडली असल्याचे घटनास्थळाची पाहणी केली असता, स्पष्ट होते.

मृतांची ओळख पटली नाही-
कार मधील मृतांजवळ कोणताही ओळखीचा पुरावा नसल्याने, त्यांची ओळख अद्यापही पटलेली नाही, चारही जणांचे मृतदेह हे सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आलेले आहेत. सदरील बाब त्यांच्या गावात कळवली असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Last Updated : Jun 14, 2021, 9:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.