ETV Bharat / state

इतिहासात पहिल्यांदाच नागनाथाचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय

author img

By

Published : Mar 18, 2020, 2:58 PM IST

संपूर्ण जगभारात कोरोना नावाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढाला असून खबरदारीचा उपाय म्हणून हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथाचे मंदिर बद ठेवण्यात येणार आहे. मंदिर दर्शनासाठी ३१ मार्च पर्यंत बंद राहणार असून यावेळी देवाचे सर्व पूजा विधी सुरू राहणार आहेत.

first-time-in-history-it-has-been-decided-to-close-the-temple-of-nagnatha
इतिहासात पहिल्यांदाच नागनाथाचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय

हिंगोली - संपूर्ण जगभरात कोरोना नावाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एक पेक्षा जास्त जण एका ठिकाणी यायला नकोत म्हणून तशा उपाय योजना केल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने औंढा नागनाथ येथील श्रीनागनाथ मंदिर दर्शनासाठी 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान समितीच्या वतीने घेतला आहे. त्यामुळे भाविकांनी सहकार्य करण्याचे आव्हान समितीच्या वतीने केले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग म्हणून जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात ये जा सुरू असते, श्री नागनाथ मंदिरातील दर्शन इतिहासात पहिल्यांदाच बंद राहणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे श्री नागनाथ देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी सांगितले. जगभरात कोरोना नावाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. शासनाने राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केली आहे. कोरोना आजाराच्या नियंत्रणासाठी काटेकोरपणे उपाययोजना केल्या जात आहेत. श्री ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. सद्यस्थितीत भाविकांची संख्या रोडावली आहे. तरीही मंदिरात होणारी गर्दी थांबविण्यासाठी 31 मार्चपर्यंत भाविकांना दर्शनाची व्यवस्था बंद करण्यात आली आहे. अध्यक्ष तथा तहसीलदार माचेवाड यांनी यासंदर्भात देवस्थान समितीला आदेश बजावला असून, सल्लागार मंडळ व विश्वस्त मंडळाने देखील या आदेशाला मंजुरी दिल्याने आता 31 मार्चपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंदी आहे. दरम्यान इतिहासात पहिल्यांदाच भाविकांसाठी मंदिर बंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

श्री नागनाथ मंदिरामधील पहाटे साडेपाच वाजता होणारे देवाचे स्नान, महापूजा, दुपारी बारा वाजता असणारा महानैवेद्य आरती तसेच दुपारी चार वाजता महादेवाला स्नान, रात्री आठ वाजता होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाला परवानगी दिलेली आहे. मात्र, यावेळी पुजारीच मंदिरात असतील असे आदेशात नमूद केले आहे. मंदिर बंद असल्यामुळे मंदिराच्या परिसरामध्ये सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.