हिंगोली - वसमत येथील कृषी चिकित्सालय तालुका फळ रोपवाटिका कार्यालयास अचानक आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत कार्यालयातील साहित्य जळून खाक झाले असून एक ते दीड लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी वाजेच्या सुमारास घडली. तर ही आग शॉटसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
दरम्यान, अग्निशमन दल याठिकाणी दाखल झाल्याने आग आटोक्यात आली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. आगीमध्ये ठिबक पाईप, काळे पाईप, वायर, खताचे पोते, प्लॅस्टिक पिशव्याच्या बॅग, प्लॅस्टिक टाकी, खुर्च्या, टेबल आदी साहित्य जळून खाक झाले. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. वेळीच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला आहे. आगीत जवळपास एक ते दीड लाखांचे नुकसान झाले आहे. तर अजून या प्रकरणी कोणतीही नोंद झालेली नाही.
हेही वाचा - 'त्या' विद्यार्थिनीचा मृत्यू शिक्षकामुळेच, परीक्षा चुकवण्यासाठी सुचवला 'भयंकर उपाय'..